Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

भुसावळमध्ये नगराध्यक्षा गायत्री भंगाळे यांचे नगराध्यक्षपद रद्द; जात प्रमाणपत्र अवैध ठरल्याने केली कारवाई

भुसावळ : जळगाव जिल्ह्यातील भुसावळ नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा गायत्री भंगाळे यांचे जात प्रमाणपत्र अवैध ठरल्याने त्यांच्या नगरसेवक व नगराध्यक्षपदावर

मोबदला दिल्यानंतरच महामार्गाचे काम करा; शिरूर-बेल्हे महामार्गाबाबत उच्च न्यायालयाचे आदेश
अचूक पंचनामे करून अहवाल सादर करा; पालकमंत्री विखेंकडून नुकसानीची पाहणी; प्रशासनास निर्देश
खत टंचाई व काळा बाजार रोखण्यासाठी जिल्हाधिकार्‍यांची धडक तपासणी

भुसावळ : जळगाव जिल्ह्यातील भुसावळ नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा गायत्री भंगाळे यांचे जात प्रमाणपत्र अवैध ठरल्याने त्यांच्या नगरसेवक व नगराध्यक्षपदावरील निवड रद्द करण्यात आली आहे. राज्य शासनाच्या या निर्णयामुळे स्थानिक राजकारणात मोठी खळबळ उडाली असून संबंधित पक्षाला मोठा धक्का बसल्याचे मानले जात आहे.
अलीकडेच पार पडलेल्या नगरपरिषद निवडणुकीत गायत्री भंगाळे विजयी ठरल्या होत्या. त्यांनी प्रतिस्पर्धी उमेदवार रजनी सावकारे यांचा पराभव केला होता. मात्र, निवडणुकीनंतर त्यांच्या जात प्रमाणपत्रावर आक्षेप घेण्यात आला. काही पदाधिकार्‍यांनी सादर केलेले प्रमाणपत्र बनावट असल्याचा आरोप करत तक्रार दाखल केली होती. त्यानंतर हे प्रकरण जिल्हा जात पडताळणी समितीकडे सोपवण्यात आले. समितीने सखोल चौकशी करून संबंधित कागदपत्रांची तपासणी केली. या तपासणीत भंगाळे यांचे जात प्रमाणपत्र वैध नसल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार जिल्हाधिकार्‍यांनी अहवाल राज्य शासनाकडे पाठवला. अहवालाचा विचार करून शासनाने तात्काळ निर्णय घेत भंगाळे यांना दोन्ही पदांसाठी अपात्र ठरवले. दरम्यान, या कारवाईवर भंगाळे यांनी आक्षेप नोंदवत ती राजकीय हेतूने करण्यात आल्याचा आरोप केला आहे. काही प्रभावी व्यक्तींच्या दबावाखाली हा निर्णय घेतल्याचे त्यांनी म्हटले आहे. सध्या या प्रकरणाकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले असून पुढील कायदेशीर व प्रशासकीय घडामोडींवर भुसावळ नगरपरिषदेतील सत्तासमीकरण अवलंबून राहणार आहे.

न्यायालयात आव्हान; पुढील निर्णयाकडे लक्ष
समितीच्या आदेशाविरोधात भंगाळे यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या प्रकरणी मंगळवारी सुनावणी अपेक्षित असून त्यानंतर पुढील दिशा स्पष्ट होणार आहे. न्यायालयाने समितीचा निर्णय कायम ठेवल्यास पोटनिवडणुकीचा मार्ग मोकळा होण्याची शक्यता आहे. अन्यथा भंगाळे यांना काहीसा दिलासा मिळू शकतो.

COMMENTS