Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मिरजेत डिजिटल अरेस्टची भीती घालून सव्वा कोटींना गंडा

सांगली / प्रतिनिधी : विजय मल्ल्याच्या टोळीतील नरेश गोयल याच्या घरी सापडलेल्या बनावट पासबुकामध्ये तुमच्या नावाचे पासबुक असून या प्रकरणी पोलीस ठाण्यात

गोंदवले येथील फर्निचरच्या शोरुमला भीषण आग; लाखोचे नुकसान; चारजण जखमी
लोकशाहीच्या वृध्द्धीसाठी तरुणांनी मतदान करावे : जीवन गलांडे
कोयना धरणाच्या प्रवेशद्वारावरील नामफलक बदलला श्री छत्रपती शिवाजी महाराज कोयना जलसागर

सांगली / प्रतिनिधी : विजय मल्ल्याच्या टोळीतील नरेश गोयल याच्या घरी सापडलेल्या बनावट पासबुकामध्ये तुमच्या नावाचे पासबुक असून या प्रकरणी पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्याची चौकशी सुरू असल्याचे सांगत मिरजेतील एका सेवानिवृत्त कर्मचार्‍याची सव्वा कोटीची फसवणुक केल्याचा प्रकार समोर आला आहे.
सेवानिवृत्त कर्मचारी रविंद्र कुलकर्णी यांनी पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार 3 ते 12 सप्टेंबर या कालावधीत मोबाईलवरील व्हॉटस् अ‍ॅपवरून अज्ञात व्यक्तींनी संपर्क साधून विजय मल्ल्या टोळीतील नरेश गोयल नावाच्या व्यक्तीच्या घरात 250 बनावट बँक पासबुके आढळली आहेत. यामध्ये तुमच्या नावाचे एक पासबुक आहे. मुंबईतील कुलाबा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल झाली आहे. तुमच्या बँक खात्याची सीबीआय व रिझर्व्ह बँकेकडून चौकशी होणार आहे. तुमच्याकडील 95 टक्के पैसे भरावे लागतील. त्याची पडताळणी झाल्यानंतर ते पैसे तुम्हाला परत मिळतील, असे सांगितले.
जर तुमच्याकडील पैसे जमा केले नाहीत तर तुम्हाला अटक करण्यात येईल. तसेच बँक खातीही गोठवण्यात येतील. तुम्हाला कोणतेही आर्थिक व्यवहार करता येणार नाहीत. यामुळे तुमचे मोठे आर्थिक नुकसान होईल. तुमच्यावर कारवाईची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे अशी भीती घालून कुलकर्णी यांच्या स्टेट बँक, बँक ऑफ इंडिया आणि एचडीएफसी या बँकेतील खात्यातील रक्कम फसवणुक करणार्‍या व्यक्तींनी विविध बँक खात्यावर आरटीजीएसच्या माध्यमातून देण्यास भाग पाडले. डिजिटल अ‍ॅरेस्टची धमकी देऊन 1 कोटी 25 लाख 50 हजार रूपये उकळले आहेत. या प्रकरणी मिरज शहर पोलीस ठाण्यात अज्ञाताविरूध्द आर्थिक फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

COMMENTS