Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

गोव्यातून दारुची तस्करी करणार्‍यांवर मोक्कातंर्गत कारवाई होणार : ना. शंभुराज देसाई

सातारा / प्रतिनिधी : गोवा बनावटीच्या दारु तस्करी रोखण्यासाठी महाराष्ट्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. गोव्यातून विनापरवाना दारू आणल्यास मोक्का अ

राजे प्रतिष्ठानची लवकरच नवी कार्यकारिणी : खा. श्री. छ. उदयनराजे भोसले
सांगली जिल्हा बँक अध्यक्षपदी मानसिंगराव नाईक; उपाध्यक्षपदी जयश्रीताई पाटील
माण तालुक्यातील सोन्या-छब्या बैल जोडीचा लंम्पीमुळे मृत्यू

सातारा / प्रतिनिधी : गोवा बनावटीच्या दारु तस्करी रोखण्यासाठी महाराष्ट्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. गोव्यातून विनापरवाना दारू आणल्यास मोक्का अंतर्गत कारवाई केली जाईल, असा इशारा राज्य उत्पादन शुल्क विभागाचे मंत्री शंभुराज देसाई यांनी दिला.
शंभूराज देसाई म्हणाले, गोव्यातून दारुची तस्करी करताना तीनवेळा एकाच व्यक्तीकडून गुन्हा घडला तर त्याच्यावर ‘महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी प्रतिबंधक कायद्यानुसार (मोक्का) कारवाई केली जाईल. यासंदर्भात संबंधित विभागाच्या आयुक्तांना सूचना दिल्या आहेत. गोवा राज्याला त्यांच्या राज्यात परमिट देण्याचा अधिकार आहे. पण आमच्या राज्यात परमिट देण्याचा अधिकार त्यांना नाही.
गोवा आणि सिंधुदूर्गला जोडणार्‍या रस्त्यांवरही तात्पुरत्या स्वरुपासाठी चेक पॉईट्स उभारणार असल्याची माहिती ना. देसाई यांनी दिली. गोवा राज्याची सीमा जवळ असल्याने गडहिंग्लज उपविभागात दारूच्या तस्करीचे प्रमाण मोठे आहे. ही तस्करी रोखण्याचे राज्य उत्पादन शुल्क विभागासमोर नेहमीच आव्हान असते.

COMMENTS