Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

नामांतराविरोधात 37 हजारांवर आक्षेप

समर्थनात केवळ 153 प्रस्ताव दाखल

छत्रपती संभाजीनगर/प्रतिनिधी ः औरंगाबादचे छत्रपती संभाजीनगर नामांतर करण्यास केंद्र सरकारने मंजूरी दिल्यानंतर अनेक पक्ष संघटनांनी या नामांतराला विर

औरंगाबादमधून आणखी तीन मुली बेपत्ता
अनौपचारिक परीक्षेची मराठवाड्यातील शिक्षकांना भीती
 शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथे जुनी पेन्शन लागू करण्यासाठी निदर्शने तिसऱ्या दिवशीही कायम 

छत्रपती संभाजीनगर/प्रतिनिधी ः औरंगाबादचे छत्रपती संभाजीनगर नामांतर करण्यास केंद्र सरकारने मंजूरी दिल्यानंतर अनेक पक्ष संघटनांनी या नामांतराला विरोध दर्शवला होता. याचवेळी या निर्णयावर 27 मार्चपर्यंत आक्षेप मागवण्यात आले होते. त्यामुळे नामांतराला विरोध करण्यासाठी आक्षेप, हरकतींची संख्या वाढत असल्याचे दिसून येत आहे. आतापर्यंत छत्रपती संभाजीनगर आणि धाराशीव नामांतराच्या निर्णयावर 37 हजारांवर आक्षेप, हरकती घेण्यात आल्या आहेत. तर समर्थनात केवळ 153 प्रस्ताव दाखल झाले असल्याचे समोर आले आहे.
महाविकास आघाडीचे तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या पदाचा राजीनामा देण्यापूर्वी औरंगाबादचे संभाजीनगर आणि उस्मानाबादचे नाव धाराशीव करण्याचा प्रस्ताव मंजूर केला होता. मात्र त्यानंतर सत्तांतरानंतर नव्याने आलेल्या फडणवीस आणि शिंदे सरकारने औरंगाबादचे छत्रपती संभाजीनगर आणि उस्मानाबादचे धाराशीव करण्याचा प्रस्ताव नव्याने मंजूर करून, तो प्रस्ताव केंद्राकडे पाठवण्यात आला होता. त्यानंतर केंद्राने या निर्णयाला मंजुरी दिली. केंद्राची मंजुरी मिळताच राज्य शासनाने अधिसूचना काढून औरंगाबाद जिल्हा, तालुका, उपविभाग आणि गावाचे नाव बदलून छत्रपती संभाजीनगर करण्याचा निर्णय घेतला. तसेच या निर्णयावर 27 मार्चपर्यंत आक्षेप मागवण्यात आले आहे. 27 मार्चपर्यंत हरकती आणि सूचना मागवण्यात आलेल्या आहेत. त्यानंतर शासनाच्या पुढील आदेशानुसार कारवाई करण्यात येणार आहे. दरम्यान, अधिसूचनेनंतर अनेक नागरिकांनी आक्षेप दाखल करण्यास सुरुवात केली आहे. विभागीय आयुक्त कार्यालयातील आवक-जावक विभागात आक्षेपांचा पाऊसच पडत आहे. आजपर्यंत जवळपास छत्रपती संभाजीनगर नामांतरावर 26 हजार 336 आक्षेप तर धाराशिवच्या नामांतरावर 11 हजार आक्षेप दाखल झाले आहेत. तर नामांतराला समर्थन देणारे 153  प्रस्ताव दाखल झालेले आहेत. 27 मार्च पर्यंत आक्षेप दाखल करून घेतले जाणार असल्याने ही संख्या आणखी वाढण्याची शक्यता आहे.

COMMENTS