Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

सांगली जिल्ह्यातून राज्यात गांजासह अंमली पदार्थ पुरवण्याचे काम

कोल्हापूर / प्रतिनिधी : सांगलीहून गांजा विक्रीसाठी शहरात आलेल्या तस्कराला गावभाग पोलिसांनी अटक केली. वसीम झाकीर सनदे (वय 21 रा. दुधगाव, जि. सांगली) अ

कोरिया रिपब्लिकची अंतिम फेरीत धडक
सातारा जिल्ह्यातील 20 पेक्षा कमी पटसंख्येच्या शाळांचे भविष्य काय?
भविष्यात सत्ताबदलात महाडिक कुटूंबाचा मोलाचा वाटा : देवेंद्र फडणवीस

कोल्हापूर / प्रतिनिधी : सांगलीहून गांजा विक्रीसाठी शहरात आलेल्या तस्कराला गावभाग पोलिसांनी अटक केली. वसीम झाकीर सनदे (वय 21 रा. दुधगाव, जि. सांगली) असे त्याचे नाव आहे. त्याच्याकडून 9 हजार 500 रुपये किंमतीचा 980 ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला. ही कारवाई बोहरा मार्केट नजीक मोकळ्या मैदानावर केली. नशेखोरांच्या अड्ड्यावरच पोलिसांनी त्याला रंगेहाथ पकडले. या कारवाईने पुन्हा एकदा गांजा तस्करीचे सांगली कनेक्शन उघड झाले आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी, वसीम सनदे हा सांगली जिल्ह्यातून परराज्यासह विविध जिल्ह्यात गांजा अंमली पदार्थ पुरवठ्याचे काम करतो. मंगळवारी वसीम हा सायंकाळी शहरात गांजा विक्रीसाठी येणार असल्याची माहिती गावभाग पोलिसांना मिळाली. बोहरा मार्केटच्या बाजूचे मैदान हे नशेखोरांचा अड्डा आहे. या ठिकाणी पोलिसांनी वसीम याला गांजा विक्री करताना रंगेहाथ पकडले. त्याच्याकडे प्लास्टिकच्या पिशवीत सुमारे 9 हजार 500 रुपये किमतीचा 980 ग्रॅम गांजा मिळून आला. पोलिसांनी वसीम याला अटक केली असून याबाबत अधिक तपास गावभाग पोलीस करत आहे. ही कारवाई पोलीस उपनिरीक्षक प्रमोद मगर, सचिन मगदूम, राम पाटील, अमर कदम, अमित कदम, नितीन ढोले विक्रम शिंदे यांनी केली.

COMMENTS