Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

वाळू वाहतुकीसाठी 50 हजारांची लाच; पोलीस अधिकारी संदीप पाटील व कर्मचारी सुरवसे एसीबीच्या जाळ्यात

बीड : अवैध वाळू वाहतूक करण्यासाठी हप्ता घेतल्याप्रकरणी चकलांबा पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी संदीप पाटील आणि पोलीस कर्मचारी विनोद सुरवसे यांना ल

लिंबागणेशमध्ये शेतकरी सहवेदना दिवस पाळला; आत्महत्याग्रस्त शेतकर्‍यांना श्रद्धांजली
आझाद मैदानावर इनाम जमिनींसाठी दशनाम गोसावी समाजाचे आंदोलन
घळाटवाडी मारहाण प्रकरण : आरोपींना तात्काळ अटक करा-अ‍ॅड.सुभाष राऊत मेंढपाळांसह ओबीसी समाजावरील हल्ले कदापी सहन करणार नाहीत; समता परिषदेचा इशा

बीड : अवैध वाळू वाहतूक करण्यासाठी हप्ता घेतल्याप्रकरणी चकलांबा पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी संदीप पाटील आणि पोलीस कर्मचारी विनोद सुरवसे यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) रंगेहाथ पकडल्याची घटना मंगळवारी (दि.10) रात्री उघडकीस आली. या कारवाईमुळे बीड पोलीस दलात एकच खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, वाळूचे वाहन बिनदिक्कत सुरू ठेवण्यासाठी संबंधित पोलीस अधिकार्‍याने दरमहा 60 हजार रुपयांची लाच मागितली होती. तडजोडीनंतर 50 हजार रुपये देण्याचे ठरले. ठरल्याप्रमाणे हे पैसे स्वीकारण्यासाठी पोलीस कर्मचारी विनोद सुरवसे उमापूर पोलीस चौकीत उपस्थित होता. दरम्यान, बीड एसीबीच्या पथकाने सापळा रचून 50 हजार रुपयांची लाच स्वीकारताना सुरवसे याला रंगेहाथ ताब्यात घेतले. ही कारवाई बीड एसीबीचे पोलीस उपअधीक्षक सोपान चिटमपल्ले यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. या प्रकरणात प्रभारी अधिकारी संदीप पाटील यांनाही ताब्यात घेण्यात आले असून दोघांविरुद्ध पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे. अवैध वाळू वाहतुकीला संरक्षण देणार्‍या अधिकारी-कर्मचार्‍यांवर कारवाई झाल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

COMMENTS