Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

फॉर यंग विमेन इन सायन्स या शिष्यवृत्ती साठी अर्ज मागवण्यात येत आहेत  

नाशिक- लॉरियाल इंडिया तर्फे त्यांच्या ‘फॉर यंग विमेन इन सायन्स’ स्कॉलरशिप २०२३ च्या आवृत्तीची घोषणा केली असून या उपक्रमा अंतर्गत राष्ट्रीय स्तराव

बच्चू कडू आक्रमक! सचिन तेंडुलकरच्या घरासमोर जोरदार आंदोलन
Filmy Masala : ‘राधे श्याम’ 14 जानेवारीला रिलीज होणार | Radhe Shyam
Kalyan : पोलिसांच्या गाडीने घेतला पेट… (Video)

नाशिक- लॉरियाल इंडिया तर्फे त्यांच्या ‘फॉर यंग विमेन इन सायन्स’ स्कॉलरशिप २०२३ च्या आवृत्तीची घोषणा केली असून या उपक्रमा अंतर्गत राष्ट्रीय स्तरावरील मेरिट वर आधारीत मुलींसाठी विशेष  असलेल्या या शिष्यवृत्तीची सुरुवात केली असून यामध्ये विज्ञान क्षेत्रात पदवी प्राप्त करु इच्छिणार्या याचा लाभ होणार आहे.  लॉरियाल इंडिया तर्फे या कार्यक्रमासाठी अर्ज मागवण्यात येत असून यशस्वी उमेदवारांना त्यांचा शैक्षणिक खर्च पूर्ण करण्यासाठी २,५०,००० रुपयांपर्यंतची शिष्यवृत्ती देण्यात येणार आहे. हा कार्यक्रम म्हणजे ‘लॉरियाल युनेस्को फॉर विमेन इन सायन्स’ या जगभरात सुरु असलेल्या उपक्रमाचा एक भाग असून महिलांना त्यांचे भविष्य घडवण्यात सहकार्य करुन त्यांच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी असलेल्या उपक्रमाचा पुढील भाग आहे.भारतात २००३ मध्ये सुरु करण्यात आलेल्या ‘फॉर यंग विमेन इन सायन्स’ स्कॉलरशिप (एफडब्ल्यूआयएस) कार्यक्रमा मुळे  गरीब घरातील तरुण मुलींना विज्ञानावर आधारीत पदवी कार्यक्रमात भाग घेऊन त्यांच्या आवडीच्या संस्थेत शिक्षण घेण्याची संधी प्राप्त होते.  हा कार्यक्रम विज्ञान क्षेत्रातील म्हणजे प्युअर सायन्सेस, ॲप्लाईड सायन्सेस, इंजिनियरींग आणि मेडिसीन सह अन्य क्षेत्रातील पदवी साठी खुला आहे.लॉरियाल इंडियाच्या कॉर्पोरेट अफेअर्स आणि एंगेजमेंटच्या संचालिका कृष्ण विलासिनी भारद्वाज  यांनी सांगितले “ लॉरियाल मध्ये आमचा असा ठाम विश्वास आहे की विज्ञान हे प्रगतीचे मूळ आहे.  स्टेम क्षेत्रात महिलांचे प्रतिनिधीत्व वाढवण्यासाठी विविध स्तरावर प्रयत्न होत असतांनाच दुसरी कडे युनेस्को इन्स्टिट्यूट ऑफ स्टॅटिस्टिक्स (यूआयएस)१ च्या माहितीनुसार केवळ जगभरांतील केवळ ३३.३ टक्के संशोधक या महिला आहेत.  ही दरी कमी करण्यासाठी आम्ही ‘फॉर यंग विमेन इन सायन्स’ स्कॉलरशिप प्रोग्राम सुरु केला असून याअंतर्गत आम्ही त्यांना वित्तीय सहकार्य करुन हुशार मुलींना विज्ञान क्षेत्रात करियर करण्याची संधी देत आहोत.  या कार्यक्रमाच्या सुरुवातीपासून आम्ही ४०० मुलींना त्यांचा प्रवास करण्याची संधी देत आहोत.  आम्ही तरुणींना प्रोत्साहन देऊन त्यांचे भवितव्य घडवण्यासह समाजात योगदान देण्यावर भर देत आहोत.”

COMMENTS