Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

‘बाबासाहेब कवाद’ पतसंस्थेला सव्वासहा कोटींचा नफा 

निघोज : पारनेर तालुक्यातील निघोज येथील बाबासाहेब कवाद निघोज नागरी सहकारी पतसंस्थेचा सन २०२५ – २०२६ मध्ये नफा ६ कोटी ३५ लाख झाला आहे. संस्थेची यंदाची आर्थिक स्थिती भाग भांडवल ७ कोटी ७० लाख, निधी ४४ कोटी ७२ लाख, ठेवी २८६ कोटी ९० लाख, कर्ज २२१ कोटी २३ लाख , सोनेतारण कर्ज १०५ कोटी ४७ लाख, गुंतवणूक १३८ कोटी ३६ लाख, कायम मालमत्ता ५ कोटी १७ लाख, थकबाकी २.३५%, नेट एनपीए 0% असून संस्थेला २९ वर्ष झाले आहे. यंदा शेतकऱ्यांच्या पिकांना बाजार भाव नसूनही सर्व सभासदांनी खातेदारांनी कर्जदारांनी संस्थेला चांगल्या प्रकारचे सहकार्य करून संस्थेची आर्थिक स्थिती उंचावली आहे. बाबासाहेब कवाद निघोज नागरी सहकारी पतसंस्थेची आर्थिक स्थिती चांगल्या प्रकारची असून सर्व खातेदार सभासद, संचालक, ठेवीदार, कर्जदार, हितचिंतक कर्मचारी यांचे संस्थेचे अध्यक्ष वसंत कवाद सर यांनी सर्वांचे आभार व्यक्त केले.  संस्थेचे संस्थापक बाबासाहेब कवाद यांनी घालून दिलेले संस्कार आणि सर्व सभासदांचा विश्वास पारदर्शक कारभार यामुळेच संस्थेची प्रगती चांगल्या प्रकारची असून हाच विश्वास कायम टिकवून ठेवण्याचे काम  आम्ही संस्थेचे अध्यक्ष उपाध्यक्ष संचालक मंडळ मुख्य कार्यकारी अधिकारी सर्व कर्मचारी वृंद करत राहणार आहोत असे अध्यक्ष वसंत कवाद यांनी म्हटले आहे.

मंजूर बंधाऱ्याच्या दुरुस्तीचे काम वेळेत पूर्ण करा : आ. आशुतोष काळे
बारामतीत उमेदवार देण्याचा काँगे्रसचा निर्धार; सुनेत्रा पवारांविरोधात उमेदवार निश्‍चिती अंतिम टप्प्यात : हर्षवर्धन सपकाळ
भोंदूगिरीला पाठबळ देणाऱ्या ३९ आमदारांचे राजीनामे घ्या;माकपची मागणी; ६ एप्रिलला राज्यभर आंदोलनाचा इशारा

निघोज : पारनेर तालुक्यातील निघोज येथील बाबासाहेब कवाद निघोज नागरी सहकारी पतसंस्थेचा सन २०२५ – २०२६ मध्ये नफा ६ कोटी ३५ लाख झाला आहे. संस्थेची यंदाची आर्थिक स्थिती भाग भांडवल ७ कोटी ७० लाख, निधी ४४ कोटी ७२ लाख, ठेवी २८६ कोटी ९० लाख, कर्ज २२१ कोटी २३ लाख , सोनेतारण कर्ज १०५ कोटी ४७ लाख, गुंतवणूक १३८ कोटी ३६ लाख, कायम मालमत्ता ५ कोटी १७ लाख, थकबाकी २.३५%, नेट एनपीए 0% असून संस्थेला २९ वर्ष झाले आहे. यंदा शेतकऱ्यांच्या पिकांना बाजार भाव नसूनही सर्व सभासदांनी खातेदारांनी कर्जदारांनी संस्थेला चांगल्या प्रकारचे सहकार्य करून संस्थेची आर्थिक स्थिती उंचावली आहे.

बाबासाहेब कवाद निघोज नागरी सहकारी पतसंस्थेची आर्थिक स्थिती चांगल्या प्रकारची असून सर्व खातेदार सभासद, संचालक, ठेवीदार, कर्जदार, हितचिंतक कर्मचारी यांचे संस्थेचे अध्यक्ष वसंत कवाद सर यांनी सर्वांचे आभार व्यक्त केले.

 संस्थेचे संस्थापक बाबासाहेब कवाद यांनी घालून दिलेले संस्कार आणि सर्व सभासदांचा विश्वास पारदर्शक कारभार यामुळेच संस्थेची प्रगती चांगल्या प्रकारची असून हाच विश्वास कायम टिकवून ठेवण्याचे काम  आम्ही संस्थेचे अध्यक्ष उपाध्यक्ष संचालक मंडळ मुख्य कार्यकारी अधिकारी सर्व कर्मचारी वृंद करत राहणार आहोत असे अध्यक्ष वसंत कवाद यांनी म्हटले आहे.

COMMENTS