Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

शारदा कन्या विद्यामंदिरची यशस्वी परंपरा कायमदहावीच्या निकालात 91.56 टक्के यश; विद्यार्थिनींची उल्लेखनीय कामगिरी

राहाता : शारदा कन्या विद्यामंदिर, राहाता विद्यालयाने यंदाच्या दहावी मंडळ परीक्षेत उज्वल यश संपादन करत आपल्या गुणवत्तापूर्ण शैक्षणिक परंपरेला साजे

मंथन परीक्षेत श्रीगोंदा माध्यमिक विद्यालयाचे यश  
स्वच्छतागृहांसाठी सव्वाकोटींचा निधी मंजूर : नगराध्यक्ष संधान
संजीवनी इंजिनिअरिंगच्या सात विद्यार्थ्यांना नोकरी 

राहाता : शारदा कन्या विद्यामंदिर, राहाता विद्यालयाने यंदाच्या दहावी मंडळ परीक्षेत उज्वल यश संपादन करत आपल्या गुणवत्तापूर्ण शैक्षणिक परंपरेला साजेसा निकाल नोंदविला आहे. विद्यालयाचा एकूण निकाल 91.56 टक्के लागला असून विद्यार्थिनींनी घवघवीत यश मिळवत विद्यालयाचा गौरव वाढविला आहे.
यावर्षी दहावीच्या परीक्षेसाठी विद्यालयातून 166 विद्यार्थिनी प्रविष्ट झाल्या होत्या. त्यापैकी 152 विद्यार्थिनी यशस्वीरित्या उत्तीर्ण झाल्या. यामध्ये 30 विद्यार्थिनी विशेष प्राविण्यासह उत्तीर्ण झाल्या असून 53 विद्यार्थिनी प्रथम श्रेणीत, 50 विद्यार्थिनी द्वितीय श्रेणीत तर 19 विद्यार्थिनी उत्तीर्ण श्रेणीत यशस्वी ठरल्या. विद्यालयातील गुणवंत विद्यार्थिनींमध्ये कु. अंतरा प्रवीण खंदारे हिने 87.80 टक्के गुण मिळवत प्रथम क्रमांक पटकाविला. कु. अक्षरा प्रवीण खंदारे हिने 87.60 टक्के गुणांसह द्वितीय क्रमांक मिळविला, तर कु. हर्षदा निलेश वाघ हिने 87.20 टक्के गुणांसह तृतीय क्रमांक प्राप्त केला. या यशस्वी विद्यार्थिनींना मुख्याध्यापक साळवे आर. व्ही., पर्यवेक्षक देशमुख आर. बी. तसेच शिक्षकवृंद यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. विद्यालयाच्या या उल्लेखनीय यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष चंद्रकांत दळवी, संघटक डॉ. अनिल पाटील, सचिव विकास देशमुख, विभागीय अध्यक्ष आ. आशुतोष काळे, सहसचिव मेनकुदळे एस. जी., बी. एन. पवार, विभागीय अधिकारी बोडखे, सहविभागीय अधिकारी नाईकवाडी, तोरणे, स्कूल कमिटीचे रमेश शिंदे, शालेय व्यवस्थापन व विकास समिती, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी, आजी-माजी विद्यार्थी, पालक आणि पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी विद्यार्थिनींचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

COMMENTS