Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

हडपसरमध्ये सिलेंडरच्या स्फोटाने आगीचे तांडव; ५ दुकाने खाक, आगीच्या ज्वाला तिसऱ्या मजल्यापर्यंत!

पुणे : पुण्यातील हडपसर परिसरातून आगीची एक अत्यंत भीषण घटना समोर आली होती. गोंधळे नगर भागात सिलेंडरचा मोठा स्फोट होऊन लागलेल्या आगीत अनेक दुकाने ज

एसी ब्लास्टमुळे लागलेल्या आगीत ९ जणांचा होरपळून मृत्यू; गच्चीचा बंद दरवाजा ठरला मृत्यूचा सापळा!
नवापूर एमआयडीसी टेक्स्टाईल कंपनीला भीषण आग; ८ ते १० कोटींची मालमत्ता जळून खाक; प्रशासनाकडून आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न
महाराष्ट्र दिनाच्या शासकीय समारंभाची रंगीत तालीम
Pune Fire: Massive Blaze Erupts At Scrap Godown in Hadapsar, Fire Tenders  Rushed to Spot (Watch Video) | 📰 LatestLY

पुणे : पुण्यातील हडपसर परिसरातून आगीची एक अत्यंत भीषण घटना समोर आली होती. गोंधळे नगर भागात सिलेंडरचा मोठा स्फोट होऊन लागलेल्या आगीत अनेक दुकाने जळून खाक झाली आहेत. या आगीची तीव्रता इतकी मोठी होती की, आगीच्या ज्वाळा थेट इमारतीच्या तिसऱ्या मजल्यापर्यंत पोहोचल्या होत्या.
हडपसरमधील गोंधळे नगर परिसरात कालव्याच्या कडेला असलेल्या एका सोसायटीतील दुकानांना अचानक आग लागली होती. स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, एका वडापावच्या दुकानातील सिलेंडरचा भीषण स्फोट झाला आणि पाहता पाहता आगीने रौद्र रूप धारण केले. या आगीत ओळीने असलेली ४ ते ५ दुकाने पूर्णपणे जळून खाक झाली आहेत.
आगीमध्ये फ्रिज, शेड, स्टेशनरी साहित्यासह व्यावसायिकांचे लाखोंचे नुकसान झाले आहे. रस्ता अरुंद असल्याने आणि घटनास्थळी बघ्यांची मोठी गर्दी जमल्याने सुरुवातीला अग्निशमन दलाच्या गाड्यांना पोहोचण्यास अडथळा निर्माण झाला. मात्र, स्थानिक नागरिक, महिला आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी तातडीने धाव घेत मदतकार्य सुरू केले.
अग्निशमन दलाच्या जवानांनी अथक प्रयत्नांनंतर आगीवर नियंत्रण मिळवले आहे. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही, परंतु छोट्या व्यावसायिकांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. भरवस्तीत झालेल्या या स्फोटामुळे परिसरात काही काळ भीतीचे वातावरण पसरले होते.
पुण्यात पुन्हा एकदा सिलेंडर स्फोटाच्या घटनेने सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. अरुंद रस्ते आणि आगीच्या वेळी होणारी गर्दी प्रशासनासाठी मोठे आव्हान ठरत असल्याचे या घटनेतून पुन्हा स्पष्ट झाले आहे.

COMMENTS