Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

अजित पवार आपल्या भूमिकेवर ठाम

छत्रपती संभाजीराजेंना स्वराज्य रक्षक म्हणावे हीच भूमिका

मुंबई/प्रतिनिधी ः छत्रपती संभाजीराजे यांना धर्मवीर म्हणण्यापेक्षा ते स्वराज्यरक्षक होते, असे विधान विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी विधानसभेत के

गाढे पिंपळगाव येथील जिल्हा परिषद शाळेत शालेय पोषण आहारात अनियमितता
 भाजपाच्या जाहीर सभेनंतर सांस्कृतिक क्रीडा मंडळ वर झालेला कचरा खेळाडूंनी उचलला 
अपहरणप्रकरणी आमदार सुर्वेसह 15 जणांवर गुन्हा

मुंबई/प्रतिनिधी ः छत्रपती संभाजीराजे यांना धर्मवीर म्हणण्यापेक्षा ते स्वराज्यरक्षक होते, असे विधान विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी विधानसभेत केले होते. त्यानंतर राज्याच्या राजकारणांत गदारोळ झाला होता. याप्रकरणी भाजप आणि शिंदे गटाने अजितदादांनी आपल्या पदाचा राजीनामा केला होता. त्यानंतर खासदार शरद पवारांनी देखील सारवासारव केली होती. मात्र बुधवारी माध्यमांशी बोलतांना अजित पवारांनी आपण आपल्या भूमिकेशी ठाम असल्याचे स्पष्ट केले आहे.
अजित पवार यांनी छत्रपती संभाजी महाराजांबाबत केलेल्या विधानाविरोधात भाजपा व शिंदे गटाने आक्रमक भूमिका घेतली आहे. राज्यभरात विविध ठिकाणी आंदोलनही केली जात आहेत. राजकीय वर्तुळातही विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. या पार्श्‍वभूमीवर अजित पवारांनी पत्रकारपरिषद घेत आपली भूमिका स्पष्ट केली.  छत्रपती संभाजी महाराज यांनी छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्माण केलेल्या स्वराज्याचे रक्षण केले. त्यामुळे छत्रपती संभाजी महाराजांना स्वराज्य रक्षकच म्हटले पाहिजे अशी माझी भूमिका आजही आहे. मात्र जसे शरद पवार यांनी स्पष्ट केले की ज्यांना धर्मवीर म्हणायचे आहे त्यांनी म्हणावे तो सर्वस्वी त्यांचा प्रश्‍न आहे असे अजित पवारांनी स्पष्ट केले आहे. तुम्ही जर तुमच्या मोबाइलमध्ये धर्मवीर शब्द शोधलात तर जवळपास सात आठ लोके आहेत ज्यांना धर्मवीर म्हटले गेले. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांनी जे स्वराज्य निर्माण केले त्या स्वराज्याचे रक्षक संभाजी महाराज होते. ज्यांना माझी भूमिका पटत नाही त्यांनी सोडून द्या. बाकीच्यांनी मला काहीही सांगू नये असेही अजित पवार यांनी म्हटले आहे.

मला भाजपने विरोधी पक्षनेते पद दिलेले नाही – अजित पवार म्हणाले, मला एक कळत नाही, आता हे मागील दोन दिवस भाजप त्यांच्या सर्व कार्यकर्त्यांना आदेश दिले, की तुम्ही अजित पवारांच्याविरोधात आंदोलन करा आणि अजित पवारांचा राजीनामा मागा. मला भाजपाने विरोधीपक्षनेते पद दिलेले नाही. मला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जे 53 आमदार आहेत, त्यांनी ते विरोधीपक्षनेते पद मला दिलेले आहे. त्यामुळे त्या पदावर मला ठेवायचे नाही ठेवायचे हा त्यांचा अधिकार आहे. बाकीच्यांना त्यामध्ये मागणी करण्याचा काहीच अधिकार नसल्याचे अजित पवारांनी ठणकावून सांगितले.

COMMENTS