Homeमहाराष्ट्र

शिर्डीत दरोड्याच्या तयारीत असलेली टोळी जेरबंद; एलसीबीची मोठी कारवाई, ७ आरोपी अटकेत

शिर्डी: गुरुपौर्णिमा उत्सवाच्या पार्श्वभूमीवर शिर्डी शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) मोठी आणि धडक कारवाई

बीड शहरातील वीज समस्यांवर अ‍ॅड. संध्याताई राजपूत यांनी अधीक्षक अभियंत्यांची घेतली भेट
कोटग्याळ-माचनूर पुलावरून पाण्याचा वेग वाढला; माचनूर-कुंडलवाडी मार्गावरील वाहतूक बंद
वाळूतस्करांवर कारवाई होते, मग ४२ कोटींच्या बोगस वृक्षलागवडीची चौकशी का नाही? डॉ. गणेश ढवळेंचा आ. विजय सिंह पंडितांना सवाल

शिर्डी: गुरुपौर्णिमा उत्सवाच्या पार्श्वभूमीवर शिर्डी शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) मोठी आणि धडक कारवाई केली आहे. शिर्डी रेल्वे स्टेशनजवळ दरोड्याच्या तयारीत असलेल्या तब्बल सात आरोपींना पोलिसांनी शिताफीने अटक केली. आरोपींकडून तलवार, चाकू, मिरची पूड, लोखंडी कटर, कटावणी, मोबाईल आणि रोख रक्कम असा एकूण १७ हजार २० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे, तर दोन आरोपी अंधाराचा फायदा घेऊन पसार झाले.

पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांच्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथक शिर्डी परिसरात पेट्रोलिंग करत होते. यावेळी गुप्त बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे, शिर्डी-रेल्वे स्टेशन मार्गावरील रेल्वे ट्रॅकजवळ काही संशयित हत्यारांसह दरोड्याच्या तयारीत असल्याची माहिती मिळाली.

माहिती मिळताच पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेऊन घेराबंदी केली. पोलिसांना पाहताच संशयितांनी अंधारात पळून जाण्याचा प्रयत्न केला, मात्र पोलिसांनी पाठलाग करून सात जणांना ताब्यात घेतले. या कारवाईत बीड आणि अहिल्यानगर जिल्ह्यातील सात आरोपींना अटक करण्यात आली असून, पसार झालेल्या दोन आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत.

अटक केलेल्या आरोपींकडून एक लोखंडी तलवार, दोन चाकू, मिरची पूड, लोखंडी कटर, कटावणी, लाकडी गिलवर, नायलॉन दोरी, तीन मोबाईल आणि रोख रक्कम असा एकूण १७,०२० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

या प्रकरणी शिर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास शिर्डी पोलीस करत आहेत. ही यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन व अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाकचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली आहे.

COMMENTS