कोपरगाव : विधानसभा मतदारसंघातील उच्च माध्यमिक व माध्यमिक परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन करणाऱ्या विविध शाळा व महाविद्यालयांतील गुणवंत विद्यार्थ्यां

कोपरगाव : विधानसभा मतदारसंघातील उच्च माध्यमिक व माध्यमिक परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन करणाऱ्या विविध शाळा व महाविद्यालयांतील गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कारासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने रविवारी (दि. १७) कलश मंगल कार्यालय येथे भव्य गुणगौरव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. आमदार आशुतोष काळे यांच्या हस्ते हा सोहळा पार पडणार असल्याची माहिती संपर्क कार्यालयातून देण्यात आली.गेल्या अनेक वर्षांपासून उच्च माध्यमिक व माध्यमिक परीक्षेत यश संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने गौरव करण्यात येत आहे. विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेचा सन्मान करून त्यांना पुढील वाटचालीसाठी प्रोत्साहन देणे हा या उपक्रमामागील प्रमुख उद्देश असल्याचे आयोजकांनी सांगितले.यंदाचा सोहळा माजी आमदार अशोकराव काळे यांच्या अध्यक्षतेखाली होणार असून प्रमुख पाहुणे म्हणून १४ व्या कोकण मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष तथा हास्यकवी अशोक नायगावकर उपस्थित राहणार आहेत. त्यांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रमाला साहित्य आणि विनोदाची विशेष किनार लाभणार असून विद्यार्थ्यांना सकारात्मक दृष्टिकोनाची प्रेरणा मिळणार असल्याचे सांगण्यात आले.तालुक्यातील विविध शाळा व महाविद्यालयांतील विशेष प्राविण्य मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांचा आमदार आशुतोष काळे व मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात येणार आहे. या सोहळ्यास विद्यार्थी, पालक, शिक्षक आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून विद्यार्थ्यांचा उत्साह वाढवावा, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने करण्यात आले आहे.

COMMENTS