Homeताज्या बातम्याअहमदनगर

गौतम पब्लिक स्कूलमध्ये बटालियनचा प्रशिक्षण कॅम्प

कोपरगाव : तालुक्यातील कर्मवीर शंकरराव काळे एज्युकेशन सोसायटी संचालित गौतम पब्लिक स्कूलमध्ये केंद्र व राज्य सरकार यांच्या संयुक्त विद्यमाने सीएटीस

संवत्सर पुलाच्या दुरुस्तीला गती द्यापावसाळ्यापूर्वी वाहतूक सुरू करा ; आ. काळे यांच्या अधिकाऱ्यांना सूचना
आमदार काळे यांची जीभ आणि पायाखालची वाळू घसरली, त्यांच्या पापाचे श्रेय ते घेणार का ? -विवेक कोल्हे
2.15 कोटीच्या कामास प्रशासकीय मान्यता ः आ. आशुतोष काळे

कोपरगाव : तालुक्यातील कर्मवीर शंकरराव काळे एज्युकेशन सोसायटी संचालित गौतम पब्लिक स्कूलमध्ये केंद्र व राज्य सरकार यांच्या संयुक्त विद्यमाने सीएटीसी २०७/५७  महाराष्ट्र बटालियन एनसीसी वार्षिक ट्रेनिंग कॅम्प पार पडत आहे. या ट्रेनिंग कॅम्पमधील विद्यार्थ्यांसाठी संस्थेचे विश्वस्त आमदार आशुतोष काळे व सचिव  चैताली  काळे यांच्या सूचनेनुसार सर्व प्रकारच्या सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या असल्याची माहिती प्राचार्य नूर शेख यांनी दिली आहे.सोमवार (दि.११) पासून हा ट्रेनिंग कॅम्प सुरु झाला असून बुधवार (२०) रोजी या कॅम्पची सांगता होणार आहे. अहिल्यानगर जिल्ह्यातील २८ शाळांतील इयत्ता ८ वी व ९ वी आणि १५ महाविद्यालयातील इयत्ता ११ वी व १२ वी आणि वरिष्ठ महाविद्यालयाच्या एनसीसीच्या एकूण ४०२ विद्यार्थी या वार्षिक ट्रेनिंग कॅम्प मध्ये प्रशिक्षण घेत आहेत. यामध्ये २६२ मुले आणि १४० मुलींचा समावेश असून गौतम पब्लिक स्कूलच्या २१ विद्यार्थ्यांचा समावेश आहे. या विद्यार्थ्यांना कॅम्प कमांडर कर्नल आशिष रैना, डेप्युटी कॅम्प कमांडर कॅप्टन अंकुश आवारे, कॅम्प सुभेदार मेजर राजेंद्र सिंग यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांची टीम सहभागी विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देत आहेत.या ट्रेनिंग कॅम्पमध्ये विद्यार्थ्यांना व्यायाम, परेड, रायफल चालविणे प्रशिक्षण, नकाशा वाचन, जर्निंग डीस्टंन्स,  फिल्ड ग्राम, हेल्थ आणि आयजीन या विषयांचे प्रशिक्षण दिले जात आहे. तसेच सेंन्ट्रल लेक्चरमध्ये आगीपासून बचाव करणे, वन विभागाच्या माध्यमातून जंगलातील प्राण्यांची ओळख आणि प्राण्यांच्या हल्ल्यातील प्राथमिक उपचार प्रशिक्षण, परिवहन विभागाकडून आपत्कालीन वाहतूक नियम आणि वाहन चालवण्याचे प्रशिक्षण दिले जात आहे.

COMMENTS