देवळाली प्रवरा : येथील सेवानिवृत्त पोलीस उपाधीक्षक नानासाहेब मिकाजी होले (वय ६७) यांचे नर्मदा परिक्रमेदरम्यान दुर्दैवी निधन झाले. नर्मदा नदीपात्र

देवळाली प्रवरा : येथील सेवानिवृत्त पोलीस उपाधीक्षक नानासाहेब मिकाजी होले (वय ६७) यांचे नर्मदा परिक्रमेदरम्यान दुर्दैवी निधन झाले. नर्मदा नदीपात्रात आंघोळीसाठी उतरले असता ते पाण्याच्या प्रवाहात अडकून गाळात रुतल्याने ही धक्कादायक घटना घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, नानासाहेब होले हे काही नातेवाईकांसह नर्मदा परिक्रमा करण्यासाठी गेले होते. परिक्रमेदरम्यान ते नर्मदा नदीत स्नानासाठी उतरले असता पाण्याच्या धारेत सापडून गाळात अडकले. त्यांना वाचवण्यासाठी त्यांचे भाचे गोविंद पऱ्हे पुढे गेले होते; मात्र भाच्याचा जीव धोक्यात येऊ नये म्हणून होले यांनी त्यांना मागे लोटून दिले. नदीवरील होडीचालकांनी आणि त्यानंतर प्रशासनाच्या आपत्ती व्यवस्थापन पथकाने तात्काळ शोध मोहीम राबवून होले यांना गाळातून बाहेर काढले, मात्र तोपर्यंत त्यांची प्राणज्योत मालवली होती.
नानासाहेब होले यांनी आपल्या कर्तृत्वाच्या बळावर देवळाली प्रवरा येथील पहिले पोलीस उपअधीक्षक (डीवायएसपी) होण्याचा मान मिळविला होता. त्यांच्या पश्चात पत्नी, अनिकेत व अभिजित ही दोन मुले, राधाकीसन व बाळासाहेब हे दोन भाऊ आणि तीन भावजया असा परिवार आहे. त्यांच्या या अकस्मात निधनामुळे देवळाली प्रवरा शहर, पोलीस दल तसेच सामाजिक क्षेत्रात तीव्र शोककळा पसरली आहे.

COMMENTS