देवळाली प्रवरा : अहिल्यानगर जिल्ह्यातील प्रादेशिक नळ पाणीपुरवठा योजनेवरील कर्मचाऱ्यांचे विविध प्रश्न सोडवण्यासाठी त्यांची संख्या नियमित करून नियमित वेतन देण्याचे निर्देश जलसंधारण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिले. त्यांच्या आश्वासनानंतर कर्मचाऱ्यांनी पुकारलेला बेमुदत संप मागे घेण्यात आला आहे. एक मे कामगार दिनाच्या पार्श्वभूमीवर प्रादेशिक नळ पाणीपुरवठा योजनेवरील कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या बेमुदत संपाच्या अनुषंगाने अहिल्यानगर येथील पोलीस ग्राउंडवर आयोजित बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. पंकज अशिया, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी, यांत्रिकी विभागाचे उपअभियंता विनोद देसाई, गणेश दीक्षित आदी उपस्थित होते. पालकमंत्री विखे पाटील यांनी स्पष्ट निर्देश देताना सांगितले की, जिल्ह्यातील सर्व पाणी व्यवस्थापन समित्या व ठेकेदारांनी कर्मचाऱ्यांना नियमित वेतन, किमान वेतन तसेच इतर सेवा सुविधा तात्काळ द्याव्यात. जे ठेकेदार किंवा समित्या कामगारांना सुविधा देणार नाहीत, त्यांच्यावर कठोर कारवाई करून त्यांना बरखास्त करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला. मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी यांनी सांगितले की, प्रादेशिक नळ पाणीपुरवठा कर्मचारी संघटनेच्या मागण्यांबाबत लवकरच सर्व समित्यांना आवश्यक ते आदेश देण्यात येतील. पुढील दहा दिवसांत समित्यांची बैठक घेऊन कामगारांच्या प्रश्नांवर योग्य तो निर्णय घेतला जाईल, असे आश्वासन त्यांनी दिले. या बैठकीस संघटनेचे राज्याध्यक्ष शौकतभाई इनामदार, उपाध्यक्ष विजय खुळे, अशोक तांबे, नितीन काचोळे, गणेश डावखर, सचिन आवटी, राहुल गायकवाड, शिवाजी विखे, भाऊ जगताप, शरद शिंदे, नारायण झुंबड आदी पदाधिकारी उपस्थित होते. दरम्यान, पालकमंत्री विखे पाटील व प्रशासनाकडून सकारात्मक भूमिका घेत कामगारांच्या मागण्यांवर तोडगा काढण्याचे आश्वासन दिल्यानंतर संघटनेने पुकारलेला बेमुदत संप मागे घेतल्याने परिस्थिती पूर्ववत झाली आहे. संप मागे घेतल्याने परिस्थिती पूर्ववत विविध मागण्यांच्या पार्श्वभूमीवर कामगार दिनापासून जिल्ह्यातील प्रादेशिक नळ पाणीपुरवठा योजनेवरील कर्मचारी १ मे पासून बेमुदत संपावर जाणार होते.दरम्यान, पालकमंत्री विखे पाटील व प्रशासनाकडून सकारात्मक भूमिका घेत कामगारांच्या मागण्यांवर तोडगा काढण्याचे आश्वासन दिल्यानंतर संघटनेने पुकारलेला बेमुदत संप मागे घेतल्याने परिस्थिती पूर्ववत झाली आहे.

देवळाली प्रवरा : अहिल्यानगर जिल्ह्यातील प्रादेशिक नळ पाणीपुरवठा योजनेवरील कर्मचाऱ्यांचे विविध प्रश्न सोडवण्यासाठी त्यांची संख्या नियमित करून नियमित वेतन देण्याचे निर्देश जलसंधारण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिले. त्यांच्या आश्वासनानंतर कर्मचाऱ्यांनी पुकारलेला बेमुदत संप मागे घेण्यात आला आहे.
एक मे कामगार दिनाच्या पार्श्वभूमीवर प्रादेशिक नळ पाणीपुरवठा योजनेवरील कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या बेमुदत संपाच्या अनुषंगाने अहिल्यानगर येथील पोलीस ग्राउंडवर आयोजित बैठकीत ते बोलत होते.
यावेळी जिल्हाधिकारी डॉ. पंकज अशिया, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी, यांत्रिकी विभागाचे उपअभियंता विनोद देसाई, गणेश दीक्षित आदी उपस्थित होते.
पालकमंत्री विखे पाटील यांनी स्पष्ट निर्देश देताना सांगितले की, जिल्ह्यातील सर्व पाणी व्यवस्थापन समित्या व ठेकेदारांनी कर्मचाऱ्यांना नियमित वेतन, किमान वेतन तसेच इतर सेवा सुविधा तात्काळ द्याव्यात. जे ठेकेदार किंवा समित्या कामगारांना सुविधा देणार नाहीत, त्यांच्यावर कठोर कारवाई करून त्यांना बरखास्त करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला.
मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी यांनी सांगितले की, प्रादेशिक नळ पाणीपुरवठा कर्मचारी संघटनेच्या मागण्यांबाबत लवकरच सर्व समित्यांना आवश्यक ते आदेश देण्यात येतील. पुढील दहा दिवसांत समित्यांची बैठक घेऊन कामगारांच्या प्रश्नांवर योग्य तो निर्णय घेतला जाईल, असे आश्वासन त्यांनी दिले.
या बैठकीस संघटनेचे राज्याध्यक्ष शौकतभाई इनामदार, उपाध्यक्ष विजय खुळे, अशोक तांबे, नितीन काचोळे, गणेश डावखर, सचिन आवटी, राहुल गायकवाड, शिवाजी विखे, भाऊ जगताप, शरद शिंदे, नारायण झुंबड आदी पदाधिकारी उपस्थित होते.
दरम्यान, पालकमंत्री विखे पाटील व प्रशासनाकडून सकारात्मक भूमिका घेत कामगारांच्या मागण्यांवर तोडगा काढण्याचे आश्वासन दिल्यानंतर संघटनेने पुकारलेला बेमुदत संप मागे घेतल्याने परिस्थिती पूर्ववत झाली आहे.
संप मागे घेतल्याने परिस्थिती पूर्ववत
विविध मागण्यांच्या पार्श्वभूमीवर कामगार दिनापासून जिल्ह्यातील प्रादेशिक नळ पाणीपुरवठा योजनेवरील कर्मचारी १ मे पासून बेमुदत संपावर जाणार होते.दरम्यान, पालकमंत्री विखे पाटील व प्रशासनाकडून सकारात्मक भूमिका घेत कामगारांच्या मागण्यांवर तोडगा काढण्याचे आश्वासन दिल्यानंतर संघटनेने पुकारलेला बेमुदत संप मागे घेतल्याने परिस्थिती पूर्ववत झाली आहे.

COMMENTS