Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

उच्च शिक्षणासाठी शिवराज विश्‍वनाथ डांगे इंग्लंडला रवाना

इस्लामपूर / प्रतिनिधी : महाराष्ट्राचे माजी ज्येष्ठ मंत्री अण्णासाहेब डांगे यांचे नातू व इस्लामपूर नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष, सांगली जिल्हा मध्य

मायणी सशस्त्र दरोडाप्रकरणी पोलिसांची पाच पथके रवाना
बोगस ‘टीईटी’ केलेल्या शिक्षकांच्या नोकर्‍या जाणार
उंबर्डे फाट्यावरील ’त्या’अपघातातील जखमीचा मृत्यू

इस्लामपूर / प्रतिनिधी : महाराष्ट्राचे माजी ज्येष्ठ मंत्री अण्णासाहेब डांगे यांचे नातू व इस्लामपूर नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष, सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकचे संचालक अ‍ॅड. राजेंद्र ऊर्फ चिमणभाऊ डांगे यांचे पुतणे शिवराज विश्‍वनाथ डांगे हे पुढील उच्च शिक्षणासाठी इंग्लंडला आज रवाना झाले. यानिमित्ताने जिल्ह्यातील शैक्षणिक, सामाजीक व राजकिय क्षेत्रात काम करणार्‍या अनेक मान्यवर पदाधिकारी तसेच डांगे व शिनगारे परिवारातील सर्वच नातेवाईक यांनी प्रत्यक्ष भेटून व दुरध्वनीवरून पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
शिवराज डांगे हा इंग्लंड येथे एमएस्सी इन कन्ट्रशन प्रोजेक्ट मॅनेजमेंट या उच्च शिक्षणासाठी इंग्लंडला आज रवाना झाला. सकाळी इस्लामपूर येथील निवासस्थानी शुभेच्छा देण्यासाठी रिघ लागली होती. यावेळी इस्लामपूरचे माजी नगराध्यक्ष आनंदराव मलगुंडे, नगरसेवक शहाजीबापू पाटील, खंडेराव जाधव, कपिल ओसवाल, डॉ. संग्राम पाटील, अबिद मोमिन, दिपक आडसूळ, राजेश माने, परेश पाटील, अण्णासाहेब डांगे इंजिनिअरिंग कॉलेजचे एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर प्रा. आर. ए. कनाई, दीनदयाळ मागासवर्गीय सहकारी सूतिगिरणीचे जनरल मॅनेजर. विनोद देशमुख, फायनान्स मॅनेजर राजेंद्र मिरजे, संत ज्ञानेश्‍वर शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष अ‍ॅड. संपतराव पाटील, जयराज गॅस एजन्सीजचे सोमनाथे वर्णे व सर्व स्टाफ, सुनिल शिनगारे, सचिन बोरगांवे, हाजी शहाबुध्दीन गनिभाई, अभिजित रासकर यांच्यासह अनेक मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या.

COMMENTS