Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

सभामंडपावर झाड कोसळून ७ भाविक ठार ; ५ गंभीर, ४० जखमी

अकोला प्रतिनिधी - अकोला शहरातील पारस परिसरातील बाबूजी महाराज मंदिरात आरती सुरू असतानाच टिनशेडवर झाड कोसळून आतापर्यंत ७ जणांचा मृत्यू झाल्याची

रुग्णालयात भरती पतीच्या भेटीस जाणार्‍या वृद्ध महिलेचा बसच्या धडकेत मृत्यू
बसखाली सापडून वृद्ध महिलेचा मृत्यू ; संगमनेर बसस्थानकावरील घटना
 करिअरसाठी उत्तम व प्रतिभावंत क्षेत्र निवडा : नवनाथ धुमाळ

अकोला प्रतिनिधी – अकोला शहरातील पारस परिसरातील बाबूजी महाराज मंदिरात आरती सुरू असतानाच टिनशेडवर झाड कोसळून आतापर्यंत ७ जणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. रविवारी सायंकाळी 8 वाजण्याच्या सुमारास वादळी वाऱ्यासह आलेल्या अवकाळी पावसामुळे हे झाड कोसळलं आणि टिनशेडखाली थांबलेले 40 ते 50 जण दबले गेले. तर या घटनेत 8 जण गंभीर जखमी आहेत. अकोला जिल्ह्यात ९ एप्रिल रोजी सायंकाळी वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस झाला. दरम्यान अकोला जिल्ह्यातील बाळापूर तालुक्यातल्या पारस गावात बाबूजी महाराज संस्थान या संस्थांनमध्ये आरती सुरू होती. मंदिराच्या परिसरात असलेल्या टिनाच्या शेड खाली दर्शनासाठी तसेच पावसापासून आपला बचाव करण्यासाठी रस्त्यावरील वाहन धारक असे एकत्रित ४५ पेक्षा अधिक लोक उपस्थित होते. अचानक यादरम्यान मंदिराला लागून असलेलं भल मोठं कडूलिंबाचे झाड अचानक उन्मळून टिनाच्या शेडवर कोसळले. शेड खाली असलेले सर्व लोक या खाली दबल्या गेले. या घटनेत आतापर्यंत ७ लोकांना आपला जीव गमावावा लागला आहे. तर काही लोकांना सुखरूप बाहेर काढून वाचवण्यात आले आहे. यातील काही लोकांना हात-पायाला गंभीर दुखापत झाली असून जखमींचा आकडा २५ आहे.

COMMENTS