Homeताज्या बातम्या

कर्जत येथे २४५ जेष्ठांची आरोग्य तपासणी

कर्जत : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांतर्गत राबविण्यात येणाऱ्या ज्येष्ठ नागरिक धोरणाच्या अनुषंगाने सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण कार्यालय, अहिल्यानगर आणि जोगाई माता सांस्कृतिक सामाजिक शैक्षणिक मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने कर्जत येथे ज्येष्ठ नागरिकांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिराचे उद्घाटन दादासाहेब सोनमाळी यांचे हस्ते झाले. यावेळी जेष्ठ नागरिक संघ जिल्हाध्यक्ष शब्बीर पठाण, डॉक्टर प्रकाश भंडारी, डॉक्टर हर्षदा बनसोडे, अजय  लांड घुले, अभिषेक शिंदे, संजय बागुल, डॉक्टर जयेश कांबळे, बाबासाहेब भैलुमे, नंदकुमार गाडे, छाया कांबळे,शेरखान पठाण, पोपट  भैलुमे  यांच्यासह अनेक मान्यवर व मोठ्या संख्येने वृद्ध महिला व पुरुष उपस्थित होते.योगेश पाटील व संजय कावरे यांच्या मार्गदर्शनाखाली एकूण २४५ ज्येष्ठ नागरिकांची यावेळी  आरोग्य तपासणी करण्यात आली. रक्तदाब, मधुमेह, विविध शारीरिक तक्रारी तसेच आरोग्यविषयक मार्गदर्शन देण्यात आले.यावेळी माजी सरपंच दादासाहेब सोनमाळी म्हणाले, “समाजाच्या उभारणीत ज्येष्ठ नागरिकांचे योगदान अतुलनीय आहे. त्यांच्या आरोग्याची काळजी घेणे ही समाजाची जबाबदारी असून अशा शिबिरांमुळे त्यांना मोठा दिलासा मिळतो.”ज्येष्ठ नागरिक संघाचे जिल्हाध्यक्ष शब्बीर पठाण यांनी सांगितले, “शासनाच्या ज्येष्ठ नागरिक धोरणाचा लाभ समाजातील प्रत्येक ज्येष्ठ व्यक्तीपर्यंत पोहोचविण्यासाठी सामाजिक संस्था आणि प्रशासन यांनी एकत्रितपणे कार्य करण्याची गरज आहे.” जिल्हाधिकारी आणि जोगाई माता सामाजिक संस्थेमुळे हा उपक्रम राबवला असून तो जिल्ह्यात सर्वत्र पुढील काळामध्ये आमच्या संघटनेच्या माध्यमातून राबविण्यात येणार आहे. 

पोल्ट्री व्यावसायिकांचे प्रश्नावर अधिवेशनात आवाज उठविण्यासाठी संघटनेने घेतली आमदार लहामटे यांची भेट
महानगरपालिकेत पेन्शन असोसिएशनचे धरणेदोन महिन्यांचे कर्मचाऱ्यांचे वेतन व पेन्शन देण्याचे आयुक्तांचे आश्‍वासन
बेकायदेशीर रस्त्यामुळे शेतजमिनीचे नुकसानचौकशी व नुकसानभरपाईसाठी श्रीगोंदे तहसिलसमोर उपोषण

COMMENTS