Homeताज्या बातम्या

बाळासाहेब गुंजाळ पाटील यांचे निधन

संगमनेर : देशासाठी मार्गदर्शक ठरलेल्या संगमनेरच्या अमृत उद्योग समूहातील विविध सहकारी संस्थांच्या उभारणीमध्ये योगदान असलेले सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याचे माजी चेअरमन ज्येष्ठ नेते बाळासाहेब गुंजाळ पाटील यांचे वयाच्या 98 व्या वर्षी वृद्धकाळाने निधन झाले आहे.सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात यांनी सहकाराच्या माध्यमातून संगमनेर तालुक्याच्या विकासाचा पाया घातला. लोकनेते बाळासाहेब थोरात यांनी सततच्या कामांमधून हा तालुका राज्यात प्रगतशील बनवला. संगमनेरच्या सहकारी संस्थांच्या उभारणीमध्ये सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात यांच्या समवेत बाळासाहेब गुंजाळ पाटील यांचे मोलाचे योगदान राहिले. त्यांनी सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखाना, शेतकी संघाचे चेअरमन पद भूषवले. हरिश्चंद्र फेडरेशनचे अध्यक्ष राजेंद्र पाटील गुंजाळ यांचे ते वडील होत.

आद्य क्रांतीवीर राघोजी भांगरे यांना ठाणे कारागृहात १७८ व्या शहीद दिनी मानवंदना
माजी आ.नरेंद्र घुले यांनी घेतली दुकळे कुटुंबाची भेट; शोकग्रस्त परिवाराचे केले सांत्वन
 गंगाधर तांबे यांचे निधन  

COMMENTS