कोपरगाव : शहरातील पाणीप्रश्नावरून पुन्हा राजकारण तापले असून, ‘५ नंबर साठवण तलावाचे पाणी नेमके कुठे जाते?’ असा तिखट सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ पदाधिकारी सुनील गंगुले यांनी सत्ताधारी कोल्हे गटाला केला आहे. नगरपालिकेची सत्ता मिळाल्यानंतर तलावातील पाणी पुन्हा येसगावला वळविण्यात आले का, असा संशयही त्यांनी प्रसिद्धी पत्रकातून व्यक्त केला आहे. आमदार आशुतोष काळे यांनी मागील चार वर्षांत शहराचा दीर्घकालीन पाणीप्रश्न मार्गी लावल्याचा दावा गंगुले यांनी केला. पूर्वी १६ ते २१ दिवसांनी मिळणारे पाणी आता चार दिवसाआड नियमित मिळत असल्याचे त्यांनी नमूद केले. मात्र सत्ताधारी गटाकडे विकासदृष्टी नसल्याने ५ नंबर साठवण तलावातून शहराला पाणी मिळते, यावरही त्यांचा विश्वास नसल्याची टीका त्यांनी केली. सुभद्रानगर येथील श्री स्वामी समर्थ मंदिर, सभामंडप व सुशोभिकरण कामाच्या भूमिपूजन कार्यक्रमात (दि. १९) सत्ताधाऱ्यांनी श्रेयवादातून गुंडागर्दी केल्याचा आरोप करत राष्ट्रवादी काँग्रेसने नगरपरिषदेच्या सर्वसाधारण सभेवर बहिष्कार टाकला होता. या पार्श्वभूमीवर आयोजित पत्रकार परिषदेत सत्ताधाऱ्यांनी केलेल्या आरोपांचा गंगुले यांनी समाचार घेतला. ५ नंबर साठवण तलावातून थेट शहराला पाणी येत नसल्याचा सत्ताधाऱ्यांचा दावा खोडून काढत, यापूर्वी तलावांच्या खोलीकरणावेळी गुप्त पाइपलाईन आढळल्याचा उल्लेख त्यांनी केला. त्या पाइपलाईनद्वारे पाणी येसगावकडे वळविले जात होते, असा आरोपही त्यांनी केला. त्यामुळे सत्तेचा दुरुपयोग करून पुन्हा अशाच प्रकारे पाणी वळविले जात आहे का, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. दरम्यान, शहर विकासासाठी आमदार काळे यांनी कोट्यवधी रुपयांचा निधी आणल्याचे सांगत, ५ नंबर साठवण तलाव, रस्ते, शासकीय इमारती, सुशोभीकरण, स्मशानभूमी विकास आदी कामे पूर्ण झाल्याचा दावा गंगुले यांनी केला. मात्र ६७ कोटी रुपयांचा निधी परत गेल्याने अनेक विकासकामांपासून नागरिक वंचित राहिल्याचा आरोप त्यांनी सत्ताधाऱ्यांवर केला.

कोपरगाव : शहरातील पाणीप्रश्नावरून पुन्हा राजकारण तापले असून, ‘५ नंबर साठवण तलावाचे पाणी नेमके कुठे जाते?’ असा तिखट सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ पदाधिकारी सुनील गंगुले यांनी सत्ताधारी कोल्हे गटाला केला आहे. नगरपालिकेची सत्ता मिळाल्यानंतर तलावातील पाणी पुन्हा येसगावला वळविण्यात आले का, असा संशयही त्यांनी प्रसिद्धी पत्रकातून व्यक्त केला आहे.
आमदार आशुतोष काळे यांनी मागील चार वर्षांत शहराचा दीर्घकालीन पाणीप्रश्न मार्गी लावल्याचा दावा गंगुले यांनी केला. पूर्वी १६ ते २१ दिवसांनी मिळणारे पाणी आता चार दिवसाआड नियमित मिळत असल्याचे त्यांनी नमूद केले. मात्र सत्ताधारी गटाकडे विकासदृष्टी नसल्याने ५ नंबर साठवण तलावातून शहराला पाणी मिळते, यावरही त्यांचा विश्वास नसल्याची टीका त्यांनी केली.
सुभद्रानगर येथील श्री स्वामी समर्थ मंदिर, सभामंडप व सुशोभिकरण कामाच्या भूमिपूजन कार्यक्रमात (दि. १९) सत्ताधाऱ्यांनी श्रेयवादातून गुंडागर्दी केल्याचा आरोप करत राष्ट्रवादी काँग्रेसने नगरपरिषदेच्या सर्वसाधारण सभेवर बहिष्कार टाकला होता. या पार्श्वभूमीवर आयोजित पत्रकार परिषदेत सत्ताधाऱ्यांनी केलेल्या आरोपांचा गंगुले यांनी समाचार घेतला.
५ नंबर साठवण तलावातून थेट शहराला पाणी येत नसल्याचा सत्ताधाऱ्यांचा दावा खोडून काढत, यापूर्वी तलावांच्या खोलीकरणावेळी गुप्त पाइपलाईन आढळल्याचा उल्लेख त्यांनी केला. त्या पाइपलाईनद्वारे पाणी येसगावकडे वळविले जात होते, असा आरोपही त्यांनी केला. त्यामुळे सत्तेचा दुरुपयोग करून पुन्हा अशाच प्रकारे पाणी वळविले जात आहे का, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
दरम्यान, शहर विकासासाठी आमदार काळे यांनी कोट्यवधी रुपयांचा निधी आणल्याचे सांगत, ५ नंबर साठवण तलाव, रस्ते, शासकीय इमारती, सुशोभीकरण, स्मशानभूमी विकास आदी कामे पूर्ण झाल्याचा दावा गंगुले यांनी केला. मात्र ६७ कोटी रुपयांचा निधी परत गेल्याने अनेक विकासकामांपासून नागरिक वंचित राहिल्याचा आरोप त्यांनी सत्ताधाऱ्यांवर केला.

COMMENTS