Homeताज्या बातम्या

वादळी वाऱ्याचा तडाखा; शेतकऱ्यांच्या सोलर पंपाच्या प्लेटचे मोठे नुकसान

पाटोदा: પાटोदा तालुक्यात मागील आठवड्यात झालेल्या जोरदार वादळी वाऱ्याचा फटका शेतकऱ्यांना बसला असून, अनेकांचे मोठे नुकसान झाले आहे. तालुक्यातील गार

वसंतदादा पाटील महाविद्यालयात लोकमान्य बाळ गंगाधर टिळक जयंती उत्साहात साजरी
पाटोदा पोलिसांकडून 14.80 लाखांचा गुटखा व प्रतिबंधित अन्नपदार्थ नष्ट
सय्यद समीया दहावीच्या परीक्षेत उज्ज्वल यश

पाटोदा: પાटोदा तालुक्यात मागील आठवड्यात झालेल्या जोरदार वादळी वाऱ्याचा फटका शेतकऱ्यांना बसला असून, अनेकांचे मोठे नुकसान झाले आहे. तालुक्यातील गारमाळ वस्ती येथील शेतकरी बळीराम एकनाथ शिंदे यांच्या शेतातील सोलर पंपाच्या प्लेट्स वादळी वाऱ्यामुळे तुटून मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

पाटोदा तालुक्यात झालेल्या या वादळामुळे अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली असून, शेतातील विविध साहित्याचे नुकसान झाले आहे. त्याचबरोबर अनेक शेतकऱ्यांच्या सोलर पंपांनाही फटका बसला आहे. गारमाळ वस्ती येथील शिंदे यांच्या सोलर पंपाच्या प्लेट्स वाऱ्याच्या तडाख्याने खराब झाल्या असून, त्यांचे अंदाजे १६ हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. या परिसरातील इतर शेतकऱ्यांच्याही शेतातील झाडे उन्मळून पडली असून शेती साहित्याचे नुकसान झाले आहे. आधीच नैसर्गिक संकटांचा सामना करणाऱ्या शेतकऱ्यांना या नुकसानीमुळे आर्थिक फटका बसला आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे तातडीने पंचनामे करून शासनाने योग्य नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.

COMMENTS