Homeताज्या बातम्या

घोडेगावमध्ये संताप; पशुवैद्यकीय दवाखान्यासमोर तीन दिवसांपासून मृत बैल तसाच, तीव्र दुर्गंधीने नागरिकांचे आरोग्य धोक्यात

घोडेगाव : येथील भाजीपाला बाजारतळावरील पशुवैद्यकीय दवाखान्यासमोर गेल्या तीन दिवसांपासून एका बैलाचा मृतदेह तसाच पडून आहे. ग्रामपंचायत प्रशासन किंवा

नांदेड विधान परिषद निवडणुकीत खळबळ; नगरसेवकांचे ‘किडनॅपिंग’ करून घोडेबाजारी? अपक्ष उमेदवार प्रशांत इंगोले यांचा प्रस्थापितांवर गंभीर आरोप
संत ईश्वर भारती महाराज समाधी सेवा हीच देवप्राप्तीचा मार्ग; बेलेश्वर संस्थान येथील हरिनाम सप्ताहात सुरेश महाराज जाधव यांचे निरूपण
“नगरसेवक पळवले जाण्याचे आरोप वास्तव, पण मतदान मतदारच ठरवणार”; कृष्णा आष्टीकरांचा दावा, महाविकास आघाडी एकसंघ असल्याचा विश्वास
Best Veterinary Hospitals in Ghodegaon, Ahmednagar - Top Animal Hospitals  near me | Justdial

घोडेगाव : येथील भाजीपाला बाजारतळावरील पशुवैद्यकीय दवाखान्यासमोर गेल्या तीन दिवसांपासून एका बैलाचा मृतदेह तसाच पडून आहे. ग्रामपंचायत प्रशासन किंवा सफाई यंत्रणेने अद्याप हा मृतदेह न हटविल्यामुळे परिसरात तीव्र दुर्गंधी पसरली असून नागरिकांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.

मृत बैलाच्या अंगावर कापड टाकून तो झाकण्याचा प्राथमिक प्रयत्न करण्यात आला असला, तरी आता तीन दिवसांनंतर मृतदेह फुगल्याने दुर्गंधी अधिकच वाढली आहे. या परिसरात नागरिकांची नेहमीच मोठी वर्दळ असते. विशेषतः मारुतीनगर, राजेगाव, शिंगवे तुकाई, लोखंडे वस्ती तसेच बऱ्हाटे वस्ती परिसरातील रहिवाशांना याच मार्गावरून नाकाला रुमाल लावून ये-जा करावी लागत आहे. तसेच शुक्रवारी येथे आठवडी भाजीपाला बाजार भरत असल्याने व्यापारी व ग्राहकांनाही या समस्येचा मोठा त्रास सहन करावा लागणार आहे.

बाजारतळावर आधीच स्वच्छतेचा अभाव असल्याची तक्रार असताना, त्यात पशुवैद्यकीय दवाखान्यासमोरच ही मानहानीकारक आणि आरोग्याला घातक असणारी परिस्थिती निर्माण झाल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. स्थानिक लोकप्रतिनिधी आणि ग्रामपंचायत प्रशासनाने या गंभीर बाबीकडे साफ दुर्लक्ष केल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. हा प्रश्न तातडीने सोडून मृत बैलाची योग्य विल्हेवाट लावावी आणि परिसराचे निर्जंतुकीकरण करावे, अशी आग्रही मागणी घोडेगाववासीयांकडून केली जात आहे.

COMMENTS