Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

शासनाच्या पेन्शन समिती आदेशाची केली होळी…

जिल्हा परिषद कर्मचार्‍यांचे आंदोलन

अहमदनगर/प्रतिनिधी ः जुनी पेन्शन योजना लागू करण्याच्या मागणीसाठी सुरु असलेल्या शासकीय कर्मचार्‍यांच्या बेमुदत संपाच्या दुसर्‍या दिवशी (बुधवारी, 15

नगर अर्बनच्या मतदारयादीवरील हरकतींवर उद्या होणार सुनावणी
ख्रिस्ती युवकांचा रोजगारांचा प्रश्‍न सोडवू ः दीपकदादा साठे
मोहा ग्रामपंचायत राष्ट्रवादीच्या ताब्यात

अहमदनगर/प्रतिनिधी ः जुनी पेन्शन योजना लागू करण्याच्या मागणीसाठी सुरु असलेल्या शासकीय कर्मचार्‍यांच्या बेमुदत संपाच्या दुसर्‍या दिवशी (बुधवारी, 15 मार्च) शासनाने शासन निर्णय काढून जुन्या पेन्शनसाठी नियुक्त केलेल्या समितीच्या पत्रकाची होळी करण्यात आली. जिल्हा परिषद कर्मचार्‍यांचा तोंडाला पाने पुसण्याचे काम बक्षी समितीकडून केले गेले असल्याने त्याच सदस्याची पुन्हा नव्याने या नव्या समितीत नियुक्ती करून शासनाने कर्मचार्‍यांचा भावनेचा कडेलोट केल्याची खंत कर्मचार्‍यांनी यावेळी व्यक्त केली. या होळी आंदोलनात जिल्हा परिषद कर्मचारी युनियनचे सुभाष कराळे, विकास साळुंखे, अभय गट, विजय कोरडे, विलास वाघ आदी सहभागी झाले होते.

जुनी पेन्शनच्या प्रमुख मागणीसाठी पुकारलेल्या संपाच्या दुसर्‍या दिवशी प्राथमिक व माध्यमिक शिक्षक संघटना समन्वय समितीच्यावतीने दुचाकी रॅली काढून शाळा बंदचे आवाहन करण्यात आले. तर नगर पंचायत समिती कार्यालयासमोर जुन्या पेन्शनसाठी चालढकल करणार्‍या सरकारच्या नावाने शिमगा करण्यात आला. या आंदोलनात समन्वय समितीचे अध्यक्ष प्रा. सुनील पंडित, महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षक संघाचे कोषाध्यक्ष राजेंद्र लांडे, शिक्षक नेते भाऊसाहेब कचरे, जुनी पेन्शन संघटनेचे अध्यक्ष महेंद्र हिंगे, वैभव सांगळे, प्राथमिक शिक्षक संघटनेचे अध्यक्ष बापूसाहेब तांबे, खासगी प्राथमिक शिक्षक संघटनेचे अध्यक्ष विठ्ठल उरमुडे, राज्य कार्याध्यक्ष अन्सार शेख, सुधीर काळे, दत्ता पाटील कुलट, राजेंद्र निमसे, शेखर उंडे, बाळासाहेब पिंपळे, गोवर्धन पांडुळे, राजेंद्र ठोकळ, आबासाहेब लोंढे, शिक्षक सेनेचे जिल्हाध्यक्ष अंबादास शिंदे, प्रशांत नन्नवरे आदींसह शिक्षक व महिला शिक्षिका सहभागी झाल्या होत्या.

सकाळी माध्यमिक शिक्षक सोसायटीसमोर शिक्षक-शिक्षिका एकत्र जमले व त्यांनी जोरदार घोषणाबाजी करीत शहरातून दुचाकी रॅली काढली. रॅलीद्वारे शिक्षकांनी ठिकठिकाणी जावून शाळा बंदचे आवाहन केले. शहरातील प्रमुख चौकातून मार्गक्रमण करीत दुचाकी रॅलीचा रेल्वे स्थानकाजवळील नगर पंचायत समितीच्या कार्यालयाजवळ समारोप झाला. यावेळी प्रमुख पदाधिकार्‍यांनी आपल्या भाषणात जुनी पेन्शन व इतर मागण्यांबाबत दुर्लक्ष करणार्‍या सरकारचा निषेध केला. यावेळी जमलेल्या आंदोलकांनी सरकारच्या नावाने बोंबाबोंब मारून जोरदार निदर्शने केली तसेच या संपातून माघार घेणारे शिक्षक नेते संभाजी थोरात यांचा सर्व शिक्षकांच्यावतीने निषेध नोंदविण्यात आला. दरम्यान, शहरातील अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या न्यू आर्टस् कॉमर्स अ‍ॅण्ड सायन्स महाविद्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले.

COMMENTS