Homeताज्या बातम्या

भूमापक पदावर निवड झाल्याबद्दल उमर परवेज खान यांचा सत्कार

पठाण अमरजान यांच्याकडून शुभेच्छांचा वर्षाव बीड : बीड शहरातील सुप्रसिद्ध फुटबॉलपटू, क्रीडा शिक्षक व प्रशिक्षक परवेज खान सर यांचे सुपुत्र उमर प

बीडमध्ये १९ जूनला मोफत मूळव्याध व भगंदर तपासणी शिबीर; सुश्रुत हॉस्पिटलचा स्तुत्य उपक्रम
राजमाता जिजाऊंना पुण्यतिथी निमित्त लिंबागणेश ग्रामपंचायत कार्यालयात विनम्र अभिवादन
नेकनूरकरांच्या ४५ वर्षांच्या तालुका मागणीतील एक टप्पा यशस्वी; अप्पर तहसील मंजुरीने नेकनूर परिसरात आनंदाचे वातावरण

पठाण अमरजान यांच्याकडून शुभेच्छांचा वर्षाव

बीड : बीड शहरातील सुप्रसिद्ध फुटबॉलपटू, क्रीडा शिक्षक व प्रशिक्षक परवेज खान सर यांचे सुपुत्र उमर परवेज खान यांची भूमी अभिलेख विभाग, छत्रपती संभाजीनगर विभागांतर्गत वडवणी येथे ‘भूमापक (Land Surveyor)’ पदावर स्पर्धा परीक्षेद्वारे निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी अखिल भारतीय पत्रकार सुरक्षा समितीचे बीड जिल्हाध्यक्ष पठाण अमरजान यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन उमर परवेज खान यांचे अभिनंदन करण्यात आले. तसेच त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या. उमर खान यांच्या यशाबद्दल उपस्थित मान्यवरांनी कौतुक व्यक्त करत, मेहनत, चिकाटी आणि योग्य नियोजनाच्या जोरावर मिळवलेले हे यश युवकांसाठी प्रेरणादायी असल्याचे सांगितले. त्यांच्या पुढील वाटचालीसाठी सर्वांनी शुभेच्छा दिल्या

COMMENTS