Homeताज्या बातम्या

घरफोडी करणारा आरोपी अवघ्या ४८ तासांच्या आत जेरबंद! एलसीबी बीडची धडक कारवाई; ३,४४,००० रुपयांचा मुद्देमाल जप्त

बीड: केज पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या घरफोडीच्या गुन्ह्यातील कुख्यात आरोपीला स्थानिक गुन्हे शाखा (LCB), बीडच्या पथकाने अत्यंत शिताफीने अवघ्या

अंबाजोगाईत एमएसईबीचा डोळे असून आंधळा कारभार! नगरपरिषद परिसरातील डीपीवरील अतिरिक्त भारामुळे व्यावसायिकांचे मोठे नुकसान
आषाढी एकादशीनिमित्त भगवानगडावर पाच लाख भाविकांची उपस्थिती; विजयी पांडुरंगाचे व भगवानबाबांचे घेतले दर्शन
काँग्रेस कार्यालयासमोर भाजपाचे आंदोलन; काँग्रेसचे जोरदार प्रतिउत्तर, घोषणाबाजीने परिसर दणाणला

बीड: केज पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या घरफोडीच्या गुन्ह्यातील कुख्यात आरोपीला स्थानिक गुन्हे शाखा (LCB), बीडच्या पथकाने अत्यंत शिताफीने अवघ्या ४८ तासांच्या आत जेरबंद करण्यात यश मिळवले आहे. केज पोलीस ठाण्यात गु.र.नं. ४८१/२०२६ कलम ३३१(४), ३०५ (अ) भारतीय न्याय संहितेप्रमाणे (BNS) घरफोडीचा गुन्हा नोंद करण्यात आला होता.

सदर गुन्ह्याचा समांतर तपास स्थानिक गुन्हे शाखा, बीड यांच्याकडून केला जात होता. दरम्यान, २९ जुलै २०२६ रोजी पोलीस उपनिरीक्षक महेश विघ्ने यांचे पथक केज हद्दीत आरोपीचा शोध घेत असताना, पथकाला मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे सदरचा गुन्हा ऋषिकेश दिलीप काळे (रा. फुलेनगर, ता. केज, जि. बीड) यानेच केल्याचे निष्पन्न झाले.

मिळालेल्या सुगाव्याच्या आधारे पोलिसांनी आरोपीस त्याच्या फुलेनगर भागातील राहत्या घरातून ताब्यात घेतले. पोलिसी खाक्या दाखवताच त्याने गुन्हा केल्याची कबुली दिली. तसेच चोरी केलेली रोख रक्कम व दागिने घरातच लपवून ठेवल्याचे सांगितले. दोन पंचासमक्ष आरोपीकडून २,७०,००० रुपये रोख आणि ७४,००० रुपये किमतीचे सोन्या-चांदीचे दागिने, असा एकूण ३,४४,००० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. आरोपीस पुढील कायदेशीर कारवाईसाठी केज पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

ही उल्लेखनीय कामगिरी पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत, अपर पोलीस अधीक्षक (अंबेजोगाई) चेतना तिडके व सहायक पोलीस अधीक्षक व्यंकटराम यांच्या मार्गदर्शनाखाली, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक शिवाजी बंटेवाड, पोउपनि महेश विघ्ने, पोहवा बप्पासाहेब घोडके, दिलीप गित्ते, महेश जोगदंड, जफर पठाण आणि चालक गणेश मराडे यांच्या पथकाने पार पाडली आहे.

COMMENTS