Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

कांद्याला ३००० रुपये हमीभाव द्या किसान सभेची मागणी; सरकारने अंत पाहू नये! डॉ. अजित नवले आक्रमक

https://www.youtube.com/watch?v=yLVoVeGaQLU आजची परिस्थिती एवढी भयानक आहे की, कांद्याचे घेतलेले उत्पादन आणि त्यासाठी झालेला खर्च भरून निघणे

अकोले तालुक्यात पेट्रोल पंप चालकांच्या अजब नियमामुळे खळबळ; शेतकऱ्यांना डिझेलसाठी आता ‘सातबारा’ द्यावा लागणार? अजित नवलेंचा सरकारवर हल्लाबोल!
डिझेलसाठी ‘सातबारा’ मागणाऱ्या पंप चालकांवर तातडीने कारवाई करा; डॉ. अजित नवलेंची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी!
महागाईचा भडका! केवळ ‘काटकसर’ सांगून भागणार नाही, सरकारने थेट कर कमी करावेत; डॉ. अजित नवले कडाडले!

आजची परिस्थिती एवढी भयानक आहे की, कांद्याचे घेतलेले उत्पादन आणि त्यासाठी झालेला खर्च भरून निघणे तर लांबची गोष्ट, पण कांद्याची काढणी करणे, तो साठवणे आणि बाजार समिती म्हणजेच मंडईपर्यंत नेण्याचा वाहतूक खर्चसुद्धा आज मिळत असलेल्या कवडीमोल भावातून निघत नाहीये. म्हणजेच, शेतकरी कांदा विकून नफा मिळवण्याऐवजी स्वतःच्या खिशातून पैसे भरून कांदा विकायला मजबूर झाला आहे.
या गंभीर संकटाच्या पार्श्वभूमीवर, कांद्याला किमान ३,००० रुपये प्रति क्विंटल हमीभाव मिळाला पाहिजे, अशी रास्त मागणी कांदा उत्पादक शेतकरी सातत्याने करत आहेत. यासाठी सरकारने केवळ तात्पुरती मलमपट्टी न करता, एक दीर्घकालीन धोरण आखण्याची गरज आहे. तसेच कांदा साठवणुकीसाठी आधुनिक आणि ठोस उपाययोजना करण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे.

COMMENTS