Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

राज्यात गारठा वाढला पावसाची शक्यता

पुणे ः गेल्या दोन दिवसांपासून राज्यात गारठा वाढला असून, अनेक ठिकाणी तापमानाचा निचांक नोंदवण्यात आला आहे. यासोबतच पुढील दोन दिवसांत हवामानात बदल ह

अवकाळी पावसाच्या नुकसानीचे तातडीने पंचनामा करा-सुरेश हात्ते
महाविकास आघाडीतच रस्सीखेच सुरू
राष्ट्रीय सायकलपटू नीरज सूर्यकांतचं ‘तिरसाट’मधून अभिनयात पदार्पण | LOKNews24

पुणे ः गेल्या दोन दिवसांपासून राज्यात गारठा वाढला असून, अनेक ठिकाणी तापमानाचा निचांक नोंदवण्यात आला आहे. यासोबतच पुढील दोन दिवसांत हवामानात बदल होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. तसेच राज्यात पावसाचा अंदाज देखील हवामान विभागाने वर्तवला आहे. भारतीय हवामान खात्याने वर्तवलेल्या ताज्या अंदाजानुसार, पुढील 48 तासात महाराष्ट्रात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
विदर्भासह, मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी हा पाऊस पडणार आहे. नागपूर, गरडचिरोली, गोंदिया, चंद्रपूर जिल्ह्यात काल हलक्या पावसाने हजेरी लावली होती. तर मोठ्या प्रमाणात धुके देखील होते. विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र व मध्य महाराष्ट्रात थंडीने नागरिक गारठले आहेत. पुणे वेधशाळेने दिलेल्या माहितीनुसार, एक वार्‍याची चक्रिय स्थिती मराठवाडा आणि विदर्भाच्या लगतच्या भागावर आहे. तसेच प्रती चक्रवातीय वार्‍यामुळे बंगालच्या उपसगागरातून आद्रता येत आहे. विशेषत: याचे प्रमाण हे मराठवाडा, विदर्भ आणि लागतच्या परिसरात जास्त आहे. यामुळे विदर्भात पुढील 48 तासांत तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपात पाऊस होण्याची शक्यता आहे. राज्याच्या उर्वरित भागात हवमान कोरडे राहण्याची शक्यता आहे. परंतु हवेतील आद्रतेमुळे हवामानात फारसा बदल होणार नाही. विदर्भातील काही भागांमध्ये अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने शेतकरी चिंतेत आहेत. पुढील काही दिवस हा पाऊस कायम राहणार असल्याने पारा आणखी घसरु शकतो. राज्यामध्ये थंडी ही कायम राहणार आहे. कोकण-गोवा यासोबतच मध्य महाराष्ट्र आणि विदर्भासह मराठवाड्यामध्ये पुढील पाच-सहा दिवस हवामान कोरडे राहू शकते. मात्र थंडीचा प्रभाव वाढू शकतो.

COMMENTS