Homeताज्या बातम्या

प्रा. चंद्रशेखर गायकवाड यांना वनस्पतीशास्त्र विषयात पीएच.डी. प्रदान

केज येथील बाबुरावजी आडसकर महाविद्यालयातील वनस्पतीशास्त्र विभागाचे प्रा. चंद्रशेखर त्र्यंबक गायकवाड यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ

धमक्या, खोट्या तक्रारींनाही न जुमानता ‘लेडी सिंघम’ शितल सय्यद यांची धडाकेबाज मोहीम; बदलीच्या चर्चेने केजकर आक्रमक
वसंतराव नाईक हरितक्रांतीचे प्रणेते; त्यांच्या जयंतीनिमित्त कृषीदिन उत्साहात साजरा – डॉ. वसुदेव बप्पा गायकवाड
महात्मा ज्योतिबा फुले समग्र क्रांतीचे प्रणेते-आनंद  गायकवाड



केज येथील बाबुरावजी आडसकर महाविद्यालयातील वनस्पतीशास्त्र विभागाचे प्रा. चंद्रशेखर त्र्यंबक गायकवाड यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, छत्रपती संभाजीनगर यांच्याकडून वनस्पतीशास्त्र विषयातील पीएच.डी. पदवी प्रदान करण्यात आली आहे.
जवळबन तलावातील शेवाळांची जैवविविधता व पाण्यातील विविध घटकांची परिणामकारकता (जावलबान धरणातील शैवाल वनस्पती आणि जलगुणवत्ता विश्लेषण) या विषयावर त्यांनी संशोधन पूर्ण केले. या संशोधनासाठी त्यांना प्रा. (डॉ.) नवनाथ काशीद, वनस्पतीशास्त्र विभाग, बाबुरावजी आडसकर महाविद्यालय, केज यांनी मार्गदर्शन केले. प्रा. गायकवाड यांच्या या यशाबद्दल श्री छत्रपती शिवाजी शिक्षण संस्थेच्या सचिव श्रीमती अर्चनाताई रमेशराव आडसकर, अंबाजोगाई साखर कारखान्याचे चेअरमन रमेशराव आडसकर, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अनिल किर्दत, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी तसेच माळेगाव येथील ग्रामस्थांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

COMMENTS