Homeताज्या बातम्या

नांदेड विभागात रेल्वेच्या तिकीट तपासणी कर्मचार्‍यांची उल्लेखनीय कामगिरी

नांदेड : दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागातील तिकीट तपासणी कर्मचार्‍यांनी जानेवारी ते जुलै २०२६ या कालावधीत प्रवाशांच्या सेवेत उल्लेखनीय कामगि

वारी-कान्हेगाव पुलाची उभारणी ही विकासाची पायाभरणी : आ. काळे
१ ऑगस्टपासून ‘हे’ ५ मोठे नियम बदलणार! एलपीजी दर, रेल्वे बुकिंग आणि आरबीआय पतधोरणाचा समावेश
छत्रपती शिवाजी महाराज केवळ सिंहासनावरच नव्हे, तर रयतेच्या हृदयावर विराजमान झाले; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे प्रतिपादन
Western Railway collects 97 crore fine from ticketless passengers | Western Railway  Ticket Checking : विनातिकीट प्रवाशांवर कारवाई... ९७ कोटींची दंडवसुली

नांदेड : दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागातील तिकीट तपासणी कर्मचार्‍यांनी जानेवारी ते जुलै २०२६ या कालावधीत प्रवाशांच्या सेवेत उल्लेखनीय कामगिरी बजावली. हरवलेल्या बॅगा व मौल्यवान वस्तू परत करणे, मोबाईल चोरीतील संशयितांना पकडणे तसेच अल्पवयीन मुलांना सुरक्षितपणे कुटुंबीयांच्या ताब्यात देणे, अशा विविध घटनांमध्ये कर्मचार्‍यांनी तत्परता आणि प्रामाणिकपणा दाखविला.

२४ जानेवारी रोजी धीरज गायकवाड यांनी रायचूर-परभणी एक्स्प्रेसमध्ये राहिलेली प्रवाशाची बॅग शोधून ती सुरक्षितपणे परत केली. २९ एप्रिल रोजी कैलास सदरे यांनी देवगिरी एक्स्प्रेसमध्ये मोबाईल चोरीप्रकरणी दोन संशयितांना पकडून एक चोरीचा मोबाईल प्रवाशाला परत केला. १४ जून रोजी राधेश्याम मीना यांनी वंदे भारत एक्स्प्रेसमध्ये राहिलेली बॅग परत मिळवून दिली. या बॅगेत ३० हजार रुपये रोख आणि कपडे होते. ९ जुलै रोजी पियुष वाजपेयी यांनी रेल्वेत एकटे प्रवास करणार्‍या तीन अल्पवयीन मुलांची त्यांच्या कुटुंबीयांशी सुरक्षित भेट घडवून आणली. तसेच २५ जुलै रोजी एस. डी. राणे यांनी नंदीग्राम एक्स्प्रेसमध्ये राहिलेली बॅग व मोबाईल फोन संबंधित प्रवाशाला सुरक्षितपणे परत केला.

तिकीट तपासणी कर्मचार्‍यांच्या या कामगिरीतून त्यांची सतर्कता, प्रामाणिकपणा, कर्तव्यनिष्ठा आणि प्रवाशांप्रती असलेली संवेदनशीलता अधोरेखित झाली आहे. नांदेड विभागाने या कर्मचार्‍यांचे कौतुक केले असून, प्रवाशांना सुरक्षित व विश्वासार्ह सेवा देण्यासाठी विभाग कटिबद्ध असल्याचे सांगितले आहे.

COMMENTS