Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

राजू नाईकला अ‍ॅट्रॉसिटी अ‍ॅक्टनुसार अटक करा

चर्मकार विकास संघ खंडाळा तालुक्याच्या वतीने तीव्र आंदोलन करण्याचा इशारालोणंद / प्रतिनिधी : मुंबई येथील रहिवासी राजू नाईक या व्यक्तीने एका चॅनेलवर

निसर्ग गार्डन कात्रजची बैलगाडी ठरली बाबाराजे जावळी केसरीची मानकरी
जनतेचे प्रश्‍न समजण्यासाठी जयंतरावांनी स्वतंत्र स्वीय सहायक नेमावा
फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात खाजगी सावकाराविरोधात चौथा गुन्हा दाखल

चर्मकार विकास संघ खंडाळा तालुक्याच्या वतीने तीव्र आंदोलन करण्याचा इशारा
लोणंद / प्रतिनिधी : मुंबई येथील रहिवासी राजू नाईक या व्यक्तीने एका चॅनेलवर मुलाखत देत असताना जातीवाचक वक्तव्य केल्याचे निदर्शनास आल्याने खंडाळा तालुक्यातील चर्मकार विकास संघाच्या वतीने अ‍ॅट्रॉसिटी अ‍ॅक्ट नुसार अटक करण्याची मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली. नायब तहसिलदार खंडाळा पोलीस निरीक्षक महेश इंगळे निवेदन यांना निवेदन देण्यात आले आहे. चर्मकार विकास संघाचे प्रदेशाध्यक्ष संजय खामकर यांच्या नेतृत्वाखाली आणि चर्मकार विकास संघ पश्‍चिम महाराष्ट्रचे अध्यक्ष कांता मोरे यांच्या मार्गदर्शनाने हे निवेदन दिले आहे. यावेळी चर्मकार विकास संघ खंडाळा तालुकाध्यक्ष नामदेव भोसले, उपाध्यक्ष सागर भोसले, कार्याध्यक्ष सुयोग सोनवणे, सुरेश कांबळे, युवा कार्याध्यक्ष निलेश कांबळे उपस्थित होते.
याबाबत दिलेल्या निवेदनात असे म्हटलेले आहे की, दि. 22 एप्रिल रोजी सांताक्रूझ, वाकोला, गावदेवी, मुंबई येथील रहिवासी राजू नाईक या व्यक्तीने एका चॅनेलवर मुलाखत देताना अनुसूचित जातीतील चर्मकार समाजातील जातीचा ’चोर चांभार’ असा उल्लेख केल्याने चर्मकार समाजातील समाजबांधव यांच्या भावना दुखावल्या आहेत. तसेच चर्मकार समाज आणि गुरू रविदास महाराज यांचा अपमान झाला आहे. अनुसूचित जाती व जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा कलम 3 (ठ) (ड) प्रमाणे हा गुन्हा सिध्द होतो. त्यामुळे या कलमाप्रमाणे गुन्हेगारावर गुन्हा दाखल करण्यात यावा. योग्य ती शिक्षा करण्यात यावी, अशी मागणी संघटनेच्या वतीने करण्यात आली. गुन्हा नोंद न केल्यास चर्मकार विकास संघ खंडाळा तालुका व समस्त चर्मकार बांधव तहसीलदार खंडाळा येथे लोकशाही मार्गाने आंदोलन करू होणार्‍या परिणामाची जबाबदारी पुर्ण प्रशासनाची असेल, असा इशारा संघटनेने दिला आहे.

COMMENTS