Homeताज्या बातम्या

स्वामित्व योजनेतून शाळांच्या मालमत्तेला मिळणार कायदेशीर कवच; जिल्ह्यातील 100 मुख्याध्यापकांची कार्यशाळा संपन्न

नांदेड : जिल्हा परिषद शाळांच्या मालमत्तेचे संरक्षण आणि कायदेशीर नोंदणी प्रक्रिया गतिमान करण्याच्या उद्देशाने जिल्हा परिषद शाळांच्या जागेचे स्वामि

नीट फेरपरीक्षेलाही पेपरफुटीचे सावट?; ‘20 लाखांत 620+ गुण’ मिळवून देण्याचे आमिष, सोशल मीडियावर एजंटांची टोळी सक्रियफेरपरीक्षेच्या प्रश्नपत्रिकाच विक्रीसाठी असल्याचा दावा; विद्यार्थी-पालकांची फसवणूक करण्याचा संशय, नांदेडमध्येही चर्चांना उधाण
कौस्तुभ मातेकर 99.60 टक्के गुण मिळवून उत्तीर्ण
शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्यासाठी सीजेपीचा एल्गार20 जूनपासून दिल्लीत बेमुदत आंदोलनाची घोषणा


नांदेड : जिल्हा परिषद शाळांच्या मालमत्तेचे संरक्षण आणि कायदेशीर नोंदणी प्रक्रिया गतिमान करण्याच्या उद्देशाने जिल्हा परिषद शाळांच्या जागेचे स्वामित्व प्रमाणपत्र मिळविण्याबाबत विशेष कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. जिल्हा परिषद नांदेडच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात आयोजित ही कार्यशाळा उत्साहात पार पडली.
मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली यांच्या संकल्पनेतून तसेच अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीपकुमार माळोदे यांच्या पुढाकाराने आयोजित या कार्यशाळेत जिल्ह्यातील पहिल्या टप्प्यातील 100 शाळांच्या मुख्याध्यापकांनी सहभाग नोंदविला. स्वामित्व योजनेअंतर्गत शाळांच्या मालमत्तेला मिळकत पत्रिका क्रमांक प्राप्त करून देण्याच्या प्रक्रियेबाबत यावेळी सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. कार्यशाळेच्या प्रारंभी नांदेड तालुक्यातील चिखली येथील जिल्हा परिषद शाळेचे स्वामित्व प्रमाणपत्र प्रातिनिधिक स्वरूपात तयार करण्यात आले. या उपक्रमामुळे शाळांच्या जागेची कायदेशीर नोंदणी करण्याच्या प्रक्रियेला गती मिळणार आहे. शिक्षणाधिकारी वंदना फुटाणे यांनी शाळांच्या मालमत्तेची नोंदणी आणि संरक्षणाचे महत्त्व अधोरेखित केले. तसेच भूमी अभिलेख विभागाचे खुडे, डाके आणि आशुतोष यांनी स्वामित्व प्रमाणपत्र मिळविण्याची प्रक्रिया, आवश्यक कागदपत्रे आणि तांत्रिक बाबींविषयी सविस्तर माहिती दिली. यावेळी उपशिक्षणाधिकारी प्रज्ञा भवरे, लेखाधिकारी निळकंठ पाचंगे, सहाय्यक प्रशासन अधिकारी राघवेंद्र मदनुरकर, समग्र बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता उबेद खान, जिल्ह्यातील गटशिक्षणाधिकारी तसेच समग्र बांधकाम विभागाचे कनिष्ठ अभियंते उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक राघवेंद्र मदनुरकर यांनी केले, तर सूत्रसंचालन धनंजय गुम्मलवार यांनी केले. या कार्यशाळेमुळे जिल्हा परिषद शाळांच्या मालमत्तेच्या नोंदणी प्रक्रियेला गती मिळून शाळांच्या जागांचे हक्क व संरक्षण अधिक बळकट होईल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.

COMMENTS