पवार साहेबांच्या मदतीने मतदार संघाचा जिव्हाळ्याचा पाणी प्रश्न सुटणार :आमदार आशुतोष काळे

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पवार साहेबांच्या मदतीने मतदार संघाचा जिव्हाळ्याचा पाणी प्रश्न सुटणार :आमदार आशुतोष काळे

 कोपरगाव प्रतिनिधी - पश्चिमेला समुद्राला वाहून जाणारे पाणी गोदावरी खोऱ्यात वळविण्यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष माजी केंद

संगमनेरात जुगार अड्डयावर पोलिसांचा छापा
जेजुरीत दारूड्या मुलाने वडिलांवर केले कोयत्याने वार | LokNews24
संवत्सरचे सुनील भाकरे यांची राष्ट्रपती शिक्षक पुरस्कारासाठी निवड

 कोपरगाव प्रतिनिधी – पश्चिमेला समुद्राला वाहून जाणारे पाणी गोदावरी खोऱ्यात वळविण्यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष माजी केंद्रीय मंत्री शरदचंद्रजी पवार यांनी स्वत: लक्ष घातले आहे. त्याबाबत त्यांनी जलसंपदा मंत्री ना. जयंतराव पाटील यांच्या सोबत आजवर अनेक बैठका घेतल्या आहेत. त्या कामाला गती देण्यासाठी पवार साहेबांची मोठी मदत होत आहे. कोपरगाव शहराचा ज्वलंत पाणी प्रश्न मार्गी लावण्यासाठी देखील पवार साहेबांचे योगदान मी कधीही विसरू शकत नाही. त्यांनी केलेल्या एक फोनवर पाच नंबर साठवण तलावाचे खोदाईचे काम आठवड्यात सुरु झाले. पवार साहेब करीत असलेली मदत पाहता कोपरगाव मतदार संघाचा जिव्हाळ्याचा पाणी प्रश्न सोडविण्यासाठी जास्त वेळ वाट पहावी लागणार नाही. पवार साहेबांच्या मदतीने मतदार संघाच्या जिव्हाळ्याचा पाणी प्रश्न देखील लवकरच सुटणार असल्याचे प्रतिपादन श्री साईबाबा संस्थानच्या विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष आ. आशुतोष काळे यांनी केले.

                     राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरदचंद्रजी पवार यांच्या ८१ व्या वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या व्हर्चुअल रॅली कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण आमदार आशुतोष काळे यांच्या पुढाकारातून कोरोनाच्या आवश्यक उपाययोजना करून रविवार (दि.१२) रोजी कृष्णाई मंगल कार्यालय कोपरगाव येथे करण्यात आले होते याप्रसंगी ते बोलत होते. या कार्यक्रमास राष्ट्रवादी कॉंग्रेस, शिवसेना, राष्ट्रीय कॉंग्रेस तसेच मित्रपक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

                  यावेळी पुढे बोलतांना ते म्हणाले की, २०१९ च्या विधानसभा निवडणुकीच्या वेळी कोपरगाव येथे झालेल्या जाहीर प्रचार सभेत भविष्यातील राज्याचे नेतृत्व करणाऱ्या प्रमुख व्यक्तीमध्ये माझा समावेश राहणार असल्याचे पवार साहेबांनी सांगितले. त्यांनी माझ्यावर एवढा मोठा विश्वास दाखविला हे मी माझे भाग्य समजतो. देशाचे माजी कृषी मंत्री, माजी संरक्षण मंत्री म्हणून त्यांनी दिलेल्या जबाबदारीला न्याय देवून देशात स्वत:ची वेगळी प्रतिमा निर्माण केली आहे. उद्योग, कृषी, महिला धोरण, साहित्य, कला, संस्कृती, खेळ अशा सर्वच क्षेत्रात पवार साहेबांचे अजोड योगदान आहे. ज्या-ज्यावेळी देशात, राज्यात संकटे येतात, संवेदनशील प्रश्न निर्माण होतात, पेचप्रसंग उदभवतात त्या त्यावेळी सत्ताधारी असो वा विरोधक पवार साहेबांचे मार्गदर्शन घेतात यावरून त्यांचे देशाच्या राजकारणातील अलौकिक महत्व अधोरेखित होते. साहेब केंद्रात मंत्री असतांना देशात मोठ्या प्रमाणात जास्त साखर उत्पादन झाले. त्यावेळी साखरेच्या बाबतीत त्यांनी योग्य भूमिका घेवून साखरेचा बफर स्टॉक,साखर निर्यात करण्याचा निर्णय, वाहतुकीचे अनुदान आदी महत्वाचे निर्णय घेतल्यामुळे खऱ्या अर्थाने साखर उद्योगाला उभारी मिळाली. तशीच परिस्थिती मागील दोन वर्षापूर्वी निर्माण झाली होती. त्यावेळी केंद्र सरकारला देखील साहेबांनी अवलंबिलेल्या धोरणांचा वापर करावा लागला. देशात असे अनेक उद्योग आहेत त्या उद्योगांना साहेबांनी योग्य दिशा देण्याचे काम केले आहे. त्यांचे राज्यासाठी व देशासाठी मोठे योगदान आहे. राज्याला यशवंतराव चव्हाण, वसंतदादा पाटील आणि पवार साहेबांचे नेतृत्व मिळाल्यामुळे राज्य आघाडीवर आहे. साहेबांना ज्या ज्यावेळी भेटलो त्यावेळी पवार साहेव मतदार संघाच्या विकासाची व माजी आमदार अशोकराव काळे यांची आपुलकीने चौकशी करीत असतात. कार्यकर्त्याला जीव कसा लावायचा हे साहेबांकडून शिकण्यासारखे आहे. साहेबांच्या विचारांवर मतदार संघाची वाटचाल सुरु असून पवार साहेबांचे विचार घराघरात पोहोचविण्याचे काम करण्याचा संकल्प राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी करावा असे आवाहन आ. आशुतोष काळे यांनी यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांना केले. व कोपरगाव तालुका राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या वतीने आमदार आशुतोष काळे यांनी शरदचंद्रजी पवार यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रम प्रसंगी कोपरगाव शहर राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या वतीने शरदचंद्रजी पवार यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या ऑनलाईन वक्तृत्व स्पर्धेचे आ. आशुतोष काळे यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले. तसेच शाहिर किशोर सासवडे यांनी रचलेल्या व सुनील जगताप यांनी निर्मिती केलेल्या आ. आशुतोष काळे यांच्यावर रचलेल्या गाण्याचे त्यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले.

                         यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष संदीप वर्पे, तालुकाध्यक्ष माधवराव खिलारी, शहराध्यक्ष सुनील गंगूले, कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष सुधाकर रोहोम सर्व संचालक मंडळ, ओ.बी.सी. सेलचे जिल्हा उपाध्यक्ष रमेश गवळी, युवक जिल्हा उपाध्यक्ष कृष्णा आढाव, महिला जिल्हा सचिव सौ. रेखा जगताप, राष्ट्रवादीचे युवक तालुकाध्यक्ष चारुदत्त सिनगर, महिला शहराध्यक्षा सौ. प्रतिभा शिलेदार, युवक शहराध्यक्ष नवाज कुरेशी, युवती तालुकाध्यक्षा सौ. वैशाली आभाळे, युवती शहराध्यक्षा सौ. माधवी वाकचौरे, विद्यार्थी तालुकाध्यक्ष निखील डांगे, शहराध्यक्ष कार्तिक सरदार, पंचायत समिती उपसभापती अर्जुनराव काळे, जिल्हा परिषद, पंचायत समितीचे सर्व सदस्य, कोपरगाव नगरपरिषदेचे राष्ट्रवादीचे सर्व नगरसेवक, सर्व सेलचे अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

COMMENTS