Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

भव्य रथातून प्रियदर्शी सम्राट अशोक महान जयंती मिरवणूक; बीडमध्ये उत्साहाचा जल्लोष; बौद्ध भिक्खू, समता सैनिक दल व बौद्ध बांधवांची मोठी उपस्थिती; सामाजिक ऐक्याचा संदेश

बीड : चक्रवर्ती सम्राट अशोक महान यांच्या जयंतीनिमित्त बीड शहरात भव्य रथातून प्रतिमेची मिरवणूक काढून उत्साहपूर्ण वातावरणात जयंती साजरी करण्यात आली

ट्रान्सजेंडर विधेयकाविरोधात बीडमध्ये विविध संघटनांचा निषेध; जिल्हाधिकार्‍यांना निवेदन
गेवराईत प्रशासनाचा बेजबाबदारपणा शिगेला; लिलाव रक्कम अडकली, तरुणाने जिल्हाधिकार्‍यांकडे आत्महत्येची परवानगी मागितली; तहसीलदारांसह सहा अधिकार्‍यांवर गंभीर आरोप; अडीच वर्षे पैसे न मिळाल्याने कर्जबाजारी तरुणाचा टोकाचा इशारा
दिव्यांग बांधवांसाठी मदतीचा हात; कोहिणी-पाटण ग्रामपंचायतीकडून निधी वितरण

बीड : चक्रवर्ती सम्राट अशोक महान यांच्या जयंतीनिमित्त बीड शहरात भव्य रथातून प्रतिमेची मिरवणूक काढून उत्साहपूर्ण वातावरणात जयंती साजरी करण्यात आली. बौद्ध धम्माचा प्रसार देशासह परदेशातही करणार्‍या या महान सम्राटाची ओळख नव्या पिढीपर्यंत पोहोचावी, या उद्देशाने भारतीय बौद्ध महासभा च्या माध्यमातून 26 मार्च रोजी देशभर जयंती साजरी केली जात आहे.
या निमित्ताने बीड शहरात सम्राट अशोक यांच्या प्रतिमेची भव्य रथातून मिरवणूक काढण्यात आली. बौद्ध भिक्खू, समता सैनिक दल, भारतीय बौद्ध महासभा तसेच बौद्ध उपासक-उपासिका यांच्या मोठ्या उपस्थितीमुळे शहरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. कार्यक्रमाची सुरुवात भारतीय बौद्ध महासभेच्या कार्यालयात झाली. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास अभिवादन करून मिरवणुकीस प्रारंभ झाला. सम्राट अशोक यांच्या प्रतिमेचा भव्य रथ शहरातील प्रमुख मार्गांवरून फिरविण्यात आला. ही मिरवणूक राजुरी वेस, कारंजा टॉवर, बलभीम चौक, माळीवेस चौक मार्गे पुढे जात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याजवळ पोहोचली. येथे अभिवादन करून त्रिशरण व पंचशील ग्रहण करण्यात आले आणि मिरवणुकीची सांगता झाली. या प्रसंगी भारतीय बौद्ध महासभा, समता सैनिक दल, भिक्खू संघ तसेच पूज्य भदंत डॉ. ए. सुमेध बोधी (राष्ट्रीय महासचिव), भंते सारिपुत्त (सातारा), भंते आनंद मेत्ता (अमरावती), भंते बुद्धघोष, भंते मोग्गलायन, भंते उपाली, भंते संघरक्षित (बीड) यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते. तसेच अमरसिंह ढाका (राज्य संरक्षण सचिव), जिल्हाध्यक्ष महालिंग निकाळजे, व्ही. एन. निसर्गन गुरुजी, कॅप्टन राजाभाऊ आठवले (मेजर जनरल, डडऊ), अरुणाताई निसर्गन, मंदाताई मस्के, जी. एम. भोले, चंद्रवदन जाधव, पी. व्ही. बनसोडे, अशोक ठोकळ, शिवाजी जाधव, गोपीनाथ बनसोडे, गौतम खेमाडे, अ‍ॅड. ओमप्रकाश गायकवाड, अ‍ॅड. हनुमंतराव कांबळे, एस. ए. शिंदे, ए. बी. जौंजाळ आदी उपस्थित होते. बीड शहरातील बौद्ध बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. शिस्तबद्ध आणि उत्साही वातावरणात पार पडलेल्या या सोहळ्याने सामाजिक ऐक्य व समतेचा प्रभावी संदेश दिला.

COMMENTS