Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

निःस्वार्थ सामाजिक कार्याची दखल; पुजा देवळेकर यांना ‘समाजभूषण’ सन्मान

कडा : समाजासाठी सातत्याने काम करणार्‍या कडा येथील पुजा देवळेकर (धोंडे) यांच्या कार्याला राज्यस्तरीय पातळीवर मान्यता मिळाली असून,त्यांना ‘समाज भूष

आमदार धनंजय मुंडे यांच्या प्रयत्नांना यश; सिरसाळा येथील घरकुल धारकांचे थकीत हप्ते खात्यावर जमा!
भव्य रथातून प्रियदर्शी सम्राट अशोक महान जयंती मिरवणूक; बीडमध्ये उत्साहाचा जल्लोष; बौद्ध भिक्खू, समता सैनिक दल व बौद्ध बांधवांची मोठी उपस्थिती; सामाजिक ऐक्याचा संदेश
गेवराईत प्रशासनाचा बेजबाबदारपणा शिगेला; लिलाव रक्कम अडकली, तरुणाने जिल्हाधिकार्‍यांकडे आत्महत्येची परवानगी मागितली; तहसीलदारांसह सहा अधिकार्‍यांवर गंभीर आरोप; अडीच वर्षे पैसे न मिळाल्याने कर्जबाजारी तरुणाचा टोकाचा इशारा

कडा : समाजासाठी सातत्याने काम करणार्‍या कडा येथील पुजा देवळेकर (धोंडे) यांच्या कार्याला राज्यस्तरीय पातळीवर मान्यता मिळाली असून,त्यांना ‘समाज भूषण’ पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. अहिल्यानगर येथे पार पडलेल्या भव्य सोहळ्यात विविध मान्यवरांच्या उपस्थितीत हा सन्मान प्रदान करण्यात आला.
सामाजिक,शैक्षणिक व महिला सक्षमीकरण क्षेत्रात त्यांनी केलेल्या उल्लेखनीय योगदानाची दखल घेत हा पुरस्कार देण्यात आला. विविध संस्थांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या कार्यक्रमात समाज हितासाठी काम करणार्‍या व्यक्तींना सन्मानित करण्यात आले. या प्रसंगी माजी महापौर भगवान फुलसौंदर ज्येष्ठ नगरसेवक बाळासाहेब बोराटे,प्रा.माणिक विधाते, किशोर डागवाले, नगरसेविका आशाताई डागवाले मंगलताई भुजबळ यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. त्यांच्या हस्ते पुजा देवळकर(धोंडे) यांना सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देण्यात आले,या यशाबद्दल आष्टी तालुक्यात आनंद व्यक्त केला जात असून, सर्व स्तरांतून पुजा देवळेकर यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

COMMENTS