Homeताज्या बातम्यामुंबई - ठाणे

भारत-अमेरिका ‘ट्रेड वॉर’ थांबणार? टॅरिफ कपातीसाठी वॉशिंग्टनमध्ये आजपासून निर्णायक चर्चा!

भारत आणि अमेरिका या दोन महासत्तांमधील व्यापार संबंध आता एका नव्या वळणावर आले आहेत. अमेरिकन सर्वोच्च न्यायालयाने जुना टॅरिफ निर्णय रद्द केल्यानंतर

जीडीपी 6.9 तर किरकोळ महागाई 4.6 टक्के राहण्याची शक्यता; रिझर्व्ह बँकेचा अंदाज
महागाई भत्त्यात दोन टक्क्यांनी; वाढ केंद्र सरकारचा निर्णय ; पगारवाढ होणार
सोने-चांदीच्या किंमतवाढीवर प्रभावी धोरणाची गरज
India-US Trade Deal: ट्रेड डील के लिए US गई टीम भारत लौटी... इन मुद्दों पर  नहीं बनी बात, अमेरिका की है ये डिमांड - India US Trade Deal Indian Team  return From

भारत आणि अमेरिका या दोन महासत्तांमधील व्यापार संबंध आता एका नव्या वळणावर आले आहेत. अमेरिकन सर्वोच्च न्यायालयाने जुना टॅरिफ निर्णय रद्द केल्यानंतर, आजपासून वॉशिंग्टनमध्ये नव्या ‘ट्रेड डील’वर अत्यंत महत्त्वाची चर्चा सुरू होत आहे.
भारताचे वरिष्ठ अधिकारी दर्पण जैन यांच्या नेतृत्वाखाली १२ अधिकाऱ्यांचे प्रतिनिधीमंडळ अमेरिकेला पोहोचले आहे. पुढील तीन दिवस ही चर्चा चालेल. यामध्ये वाणिज्य, सीमा शुल्क आणि परराष्ट्र मंत्रालयाचे अधिकारी सामील असून, फेब्रुवारीत स्थगित झालेली ही चर्चा आता पुन्हा जोमाने सुरू झाली आहे.
हत्त्वाचे म्हणजे, ७ फेब्रुवारीला भारतीय वस्तूंवरील टॅरिफ ५० टक्क्यांवरून थेट १८ टक्क्यांवर आणला होता. रशियाकडून तेल खरेदी केल्यामुळे लागलेला अतिरिक्त २५ टक्के टॅरिफही हटवण्यात आला होता. मात्र, आता २४ फेब्रुवारीपासून ट्रम्प सरकारने सर्वच देशांवर १० टक्के समान टॅरिफ लावल्याने भारताच्या अडचणी वाढल्या आहेत.
जागतिक व्यापाराची समीकरणे बदलली आहेत! २०२५-२६ मध्ये अमेरिकेला मागे टाकत चीन पुन्हा भारताचा नंबर १ चा व्यापारी भागीदार बनलाय. ही जागा पुन्हा मिळवण्यासाठी अमेरिका आता भारताला मोठी सवलत देणार का? याकडे सर्वांचे लक्ष आहे.
भारताने आगामी ५ वर्षांत अमेरिकेकडून ५०० अब्ज डॉलर्सचे सामान खरेदी करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. यामध्ये तंत्रज्ञान, विमाने आणि शस्त्रास्त्रांचा समावेश असेल. या बदल्यात भारताच्या समुद्री उत्पादनांना आणि कापड उद्योगाला अमेरिकेत मोठी बाजारपेठ मिळण्याची आशा आहे.

COMMENTS