खैरेंचा खुंटा उपटू शकतो

Homeताज्या बातम्यासंपादकीय

खैरेंचा खुंटा उपटू शकतो

महाराष्ट्राच्या राजकारणात आरोप प्रत्यारोप, धमक्या, मारामारी, गुंडगिरी, दादागिरी हे सारे सुरु आहे हे सर्वसृत. किंबहुना जेवढे राजकारणी आहेत महाराष्ट्रा

शिवसेनेचा घसरता आलेख
भाजप सत्ता आणि वाद
पंतजलीचा दावा आणि भूल

महाराष्ट्राच्या राजकारणात आरोप प्रत्यारोप, धमक्या, मारामारी, गुंडगिरी, दादागिरी हे सारे सुरु आहे हे सर्वसृत. किंबहुना जेवढे राजकारणी आहेत महाराष्ट्रात त्यापैकी आर्धे गुंड प्रवृत्तीचे आहे. हे निवडणुकांमध्ये जनतेला दिलेले आश्वासने पूर्ण करत नाहीत. म्हणजेच ते जनतेची फसवणूक करत आहेत. याला कुणीही  अपवाद नाही. जातीच्या आणि धर्माच्या या राजकारणात सर्वच प्रस्तापित पक्षांनी वंचित समाजाला नेहमी वंचित ठेवले खरे पण मागील लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी सर्वांची पंचायत करून टाकली. वंचित बहुजन आघाडीमुळे राज्याच्या राजकारणाचे समीकरण बदलून गेले हे खरेच. पण या सर्व घडामोडीमध्ये अनेकांनी  वंचित बहुजन आघाडीवर आरोप केले. यामध्ये वंचित बहुजन आघाडी ही भाजपची बी टीम आहे. आणि दुसरा आरोप वंचित आघाडीने पैशे घेतले.
औरंगाबादचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी दोन दिवसापूर्वी वंचित बहुजन आघाडी आणि एमआयएम यांच्यावर पैसे घेतल्याचा गंभीर आरोप केला होता.  ‘भाजपने मला लोकसभेत पराभूत करण्यासाठी एमआयएम व वंचित बहुजन आघाडीला एक हजार कोटी रुपये दिले, असा खळबळजनक आराेप शिवसेनेचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी केला हाेता. या विधानावर वंचितच्या औरंगाबादच्या कार्यकर्त्यांनी शिवसेनेचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांच्या तोंडाला (थोबाडाला) काळे फासण्याचा इशारा दिला होता. औरंगाबादमध्ये हे घडू शकते याचा अंदाज चंद्रकांत खैरे यांना आहे. किंबहुना याच्या पुढे हे प्रकरण जाऊ शकते याचाही चंद्रकांत खैरे यांना अंदाज. त्यामुळे खैरे महोदयांनी आपली भूमिका बदलून चूक झाल्याचे मान्य केले.
ही माघार खैरेंनी घेतली त्यामागे विविध राजकीय समीकरणे आहेत. त्यातील एक समीकरण म्हणजे खैरेंच्या या विधानाचा फटका फक्त खैरे यांनाच नाही तर तो शिवसेनेला देखील बसणार आहे. त्यांच्या महाविकास आघाडीला बसणारा आहे. म्हणून चंद्रकांत खैरे यांची ही माघार. दुसरे म्हणजे त्यांनी फक्त वंचित बहुजन आघाडीवरील आरोप मागे घेतले आहेत एमआयएम वरील नाही. याचे कारण हे खैरे यांच्या फायद्याचे आहे. कारण इथे खैरे यांना हिंदू- मुस्लिम असे राजकारण करायचे आहे. त्यामुळे आपल्या आरोपांबाबत चंद्रकांत खैरे यांनी लेखी खुलासाही केला आहे. त्यात ते म्हणतात की, ‘वंचित बहुजन आघाडीचा उल्लेख अनवधानाने झाला, मी माझे शब्द मागे घेत आहे. वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते, पदाधिकारी यांच्या भावना दुखावण्याचा कोणताही उद्देश नव्हता,’ असे पत्र चंद्रकांत खैरे यांनी वंचित बहुजन आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष रेखाताई ठाकूर यांना पाठवले आहे. पण यामागे अजून एक गोष्ट आहे ती म्हणजे, शिवसेनेची जशी स्टाईल आहे तशीच स्टाईल औरंगाबादमध्ये वंचितची आहे. आणि खैरे यांच्या मदतीला तिथे कुणी येणार नाही. त्यामुळे खैरेंचा खुंटा उपटू शकतो हे त्यांना ज्ञात. आता वंचितवर अनेकांनी पैसे घेतल्याचे आरोप केले. पण ते आरोप करणाऱ्या खैऱ्या बांड्याना वंचितने कधी उत्तर दिले नाही.

COMMENTS