Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

धारूर पोलिसांची धडक कारवाई : 31 लाखांचा प्रतिबंधित गुटखा जप्तइनोव्हा क्रिस्टासह मोठा मुद्देमाल हस्तगत; दोन आरोपी अटकेत

महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेल्या गुटखा, पान मसाला व सुगंधी तंबाखूची अवैध वाहतूक करणार्‍या टोळीवर धारूर पोलिसांनी मोठी कारवाई करत तब्बल 31 ल

जिम ट्रेनर बनला भोंदू बाबा; अंगात देवी येत असल्याचा बनाव करून लोकांकडून उकळले पैसे आणि महागडी दारू!
हद्दपार आरोपी वाळू चोरी करताना जेरबंद; राहुरी पोलिसांची कारवाई; ३२ लाखांचा मुद्देमाल जप्त
मुस्लिम आरक्षण मोर्चाला सशर्त पाठिंबा; संयोजकांनी भूमिका स्पष्ट करावी-अ‍ॅड.प्रा. इलियास इनामदार
Beed Crime: बीड हादरलं! धारूरमध्ये पोलिसांवर भीषण दगडफेक; पोलीस उपनिरीक्षक  भवर जखमी | Navarashtra



महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेल्या गुटखा, पान मसाला व सुगंधी तंबाखूची अवैध वाहतूक करणार्‍या टोळीवर धारूर पोलिसांनी मोठी कारवाई करत तब्बल 31 लाख 62 हजार 80 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या कारवाईत दोन आरोपींना अटक करण्यात आली असून इतर आरोपींचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
सहाय्यक पोलिस अधीक्षक तथा उपविभागीय पोलिस अधिकारी, केज विभाग यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार 8 मे 2026 रोजी आडस ते धारूर रोडदरम्यान नाकाबंदी करण्यात आली होती. धारूर पोलिस स्टेशनचे प्रभारी अधिकारी सपोनि देविदास वाघमोडे यांच्या नेतृत्वाखाली रोडकर डुबे प्लॉट परिसरात पोलिसांनी सापळा रचला होता. नाकाबंदी दरम्यान पांढर्‍या रंगाची ढेूेींर खपर्पेींर उअ‍ॅूीींर संशयास्पदरीत्या येताना दिसली. पोलिसांनी वाहन थांबवून तपासणी केली असता वाहनातून गुटखा, पान मसाला आणि सुगंधी तंबाखूचा तीव्र वास येत होता. पंचांसमक्ष वाहनाची झडती घेतली असता महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेला मोठ्या प्रमाणात गुटखा व पान मसाला आढळून आला. तपासणीदरम्यान वाहनातील व्यक्तींनी आपली नावे सय्यद कलीम निजाम सय्यद (वय 42, रा. फुलेनगर, माजलगाव) व सिद्दीकी अब्दुल अहद जुबेर अहमद (वय 19, रा. अशोकनगर, माजलगाव) अशी सांगितली. दोघांनाही पोलिसांनी ताब्यात घेत अटक केली. पोलिसांनी जप्त केलेल्या मुद्देमालामध्ये वी-1 बिग सुगंधी तंबाखू, विमल पान मसाला, विविध प्रकारचा गुटखा, रजनीगंधा पान मसाला, इनोव्हा क्रिस्टा वाहन तसेच दोन मोबाईल फोन यांचा समावेश आहे. जप्त वाहनाची किंमत सुमारे 24 लाख रुपये असून एकूण मुद्देमालाची किंमत 31 लाख 62 हजार 80 रुपये इतकी असल्याचे पोलिसांनी सांगितले. या प्रकरणी धारूर पोलिस ठाण्यात गुन्हा क्रमांक 186/2026 नोंद करण्यात आला असून आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिता तसेच अन्न सुरक्षा व मानके कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फरार आरोपींचा शोध सुरू असून पुढील तपास सपोनि देविदास वाघमोडे व सपोनि रमाकांत भुसारी करीत आहेत. ही कारवाई पोलिस अधीक्षक नवनीत काँवत, प्रभारी पोलिस अधीक्षक सचिन पांडकर आणि अपर पोलिस अधीक्षक चेतना तिडके यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.

COMMENTS