निर्यात बंद असल्याने फळांचा राजा मिळेल स्वस्तात

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

निर्यात बंद असल्याने फळांचा राजा मिळेल स्वस्तात

महाराष्ट्रात अवकाळी पाऊस सुरू आहे. आंब्याचे उत्पादन 40 टक्के उत्पादन कमी झाले असले, तरी या वेळी फळांचा राजा असलेल्या आंब्याची किंमत फार वाढणार नाही.

प्रहार पक्षाचे महानगर उपाध्यक्ष गोविंद गिरी यांचे टॉवरवर चढून आंदोलन.
झोपडीत शिरून बिबट्याने महिलेचे लचके तोडून संपवले | LOKNews24
बिअर बार मध्ये झालेला गोळीबार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद

मुंबई/प्रतिनिधीः महाराष्ट्रात अवकाळी पाऊस सुरू आहे. आंब्याचे उत्पादन 40 टक्के उत्पादन कमी झाले असले, तरी या वेळी फळांचा राजा असलेल्या आंब्याची  किंमत फार वाढणार नाही. त्याचे कारण आंतरराष्ट्रीय विमान वाहतूक कोरोनामुळे बंद असल्याने परदेशात आंब्याची निर्यात होण्याची शक्यता कमीच आहे. त्यामुळे भारतीय ग्राहकांना चांगला आंबा तेही फारशी दरवाढ न होता खायला मिळणार आहे. 

गेल्या वर्षी 2000-2200 रुपयात पाच डझनांची हापूस आंब्याची पेटी मिळत होती.  या वेळी तिची किंमत 2200-2400 रुपये दरम्यान असणे अपेक्षित आहे. महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशामधील आंब्याची निर्यातही ठप्प होण्याची शक्यता आहे. यापूर्वी लंगडा, चौसा आणि दशहरा असे आंब 40 ते पन्नास रुपये किलो मिळत होते. या वेळीदेखील त्याच दरात ते मिळणार आहेत. राष्ट्रीय आंबा डेटाबेसनुसार जगातील 45 टक्के आंबे भारतात आढळतात. सर्वाधिक पसंतीच्या हापूस आंब्यापैकी 80 टक्के उत्पादन महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, ठाणे, पालघर या जिल्ह्यात तसेच कर्नाटकातील काही जिल्ह्यात उत्पादन होते. 

डिझेलच्या दरात वाढ झाल्याने वाहतूक महाग झाली आहे. त्यामुळे प्रत्येक बॉक्समध्ये 200 रुपयांची वाढ झाली आहे.  मार्चमध्ये कोकणात पिकण्यापूर्वी फळे पडली आणि सरासरी तापमान 34 ते 42 अंश होते. त्यामुळे कोकणातील आंब्याचे 30 ते 40 टक्के नुकसान झाले. डिसेंबरमध्ये झालेल्या अवकाळी पावसानेही नुकसान केले. किंमती वाढवण्याची अपेक्षा होती; पण आंतरराष्ट्रीय निर्यात होणार नसल्याने आंब्याचे भाव फार वाढणार नाहीत. आंबा उत्पादक शेतकर्‍यांचे नुकसान होणार असले, तरी भारतीय ग्राहकांची मात्र चंगळ होणार आहे.  2014-15 मध्ये 28 युरोपियन देशात हापूसच्या निर्यात बंद झाली होती; परंतु  2015-16 पासून निर्यातीस पुन्हा सुरुवात झाली. दरवर्षी सुमारे 50 हजार टन आंबा दुबई, युएई, ओमान, चीन, युरोपीयन राष्ट्रे, जपान, दक्षिण कोरिया, अमेरिका ऑस्ट्रेलिया, सिंगापूर आणि नेदरलँड्सला जातो. सहा हजार मेट्रिक टन केवळ संयुक्त अरब अमिराती, दुबई, ओमान, अमेरिकेला जातो. 

पाकिस्तानमुळे निर्यातीवर परिणाम

उत्तर प्रदेशातून आठशे टन आंबा निर्यात होण्याची शक्यता होती; परंतु उत्तर प्रदेशाच्या आंब्याला आता पाकिस्तानी आंब्याची स्पर्धा आहे. या वेळी पाकिस्तानी रुपयाचे मूल्य कमी असल्याने तेथील आंबा आखाती देशांसाठी स्वस्त होणार आहे. 

COMMENTS