नांदेड : डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, विष्णुपुरी येथे रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना स्वच्छ व आरोग्यदायी पिण्याचे

नांदेड : डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, विष्णुपुरी येथे रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना स्वच्छ व आरोग्यदायी पिण्याचे पाणी उपलब्ध व्हावे, या उद्देशाने ‘वॉटर फिल्टर विथ कुलर’ दान करण्यात आले आहे.
भीषण उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर रुग्ण व नातेवाईकांची होणारी गैरसोय लक्षात घेऊन ‘हॅपी क्लब’ व ‘नांदेड शांतता कमिटी’ यांच्या वतीने हा स्तुत्य उपक्रम राबविण्यात आला. अॅड. मोहम्मद कासिम वसीम बाबुसेठ तसेच हॅपी क्लबचे अध्यक्ष मोहम्मद शोहेब यांच्या सहकार्याने बालरोग विभागातील वॉर्ड क्रमांक ७ साठी हे वॉटर फिल्टर रुग्णालयाला प्रदान करण्यात आले.
याप्रसंगी अधिष्ठाता डॉ. सुधीर देशमुख, वैद्यकीय अधीक्षक डॉ. विजयकुमार कापसे, बालरोग विभागप्रमुख डॉ. किशोर राठोड, उपवैद्यकीय अधीक्षक डॉ. शिवानंद देवसरकर उपस्थित होते. यावेळी अधिष्ठाता डॉ. देशमुख यांनी समाजातील दाते आणि सामाजिक संस्थांनी सामाजिक दायित्वाच्या भावनेतून रुग्णालयाला रुग्णोपयोगी साहित्य उपलब्ध करून द्यावे, असे आवाहन केले. या उपक्रमासाठी समाजसेवा अधीक्षक राजरत्न केळकर व कुणाल महागडे यांनी विशेष समन्वय साधला.

COMMENTS