Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

एफआरपी द्या अन्यथा वसुली थांबवा : पाटील

फोटो : वीज वितरण कंपनीच्या अधिकार्‍यांशी चर्चाकरताना शेतकरी संघटनेचे पदाधिकारी. पाटण / प्रतिनिधी : तालुक्यातील सहकारी पाणीपुरवठा संस्था व शेतक

उसाचे एकही कांडे कारखान्यापर्यंत जाऊ देणार नाही : स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकार्‍यांचा इशारा
पाणीदार वरूडची महती देशभरात पसरेल : इंद्रजीत देशमुख
औंधच्या तनपुरे कुटुंबियांकडून गाईच्या डोहाळ जेवणाचा कार्यक्रम

पाटण / प्रतिनिधी : तालुक्यातील सहकारी पाणीपुरवठा संस्था व शेतकर्‍यांवर विजवितरण कंपनीचे अधिकारी व कर्मचारी वीजबील वसुलीसाठी दबाव टाकून सक्तीने बील वसूल करत आहेत. काही संस्था व शेतकर्‍यांचे वीज कनेक्शन बंद करण्यात आले आहेत. कारखाना सुरू होऊन दीड महिना होऊनही आमची हक्काची एफआरपी रक्कम मिळाली नाही. ही रक्कम एकरकमी द्या अन्यथा वसुली थांबवा, अशी मागणी पाटण तालुका शेतकरी संघटनेचे अध्यक्ष प्रशांत पाटील यांनी पत्रकाद्वारे केली आहे.
पत्रकात ते म्हणतात, एकरकमी एफआरपी बाबत कारखानदार एका शब्दानेही काही बोलत नाहीत. शेतकर्‍यांच्या कारखान्याकडे डे असलेल्या रकमेचा परतावा कसा होणार याबाबत सर्वजण मौन बाळगून आहेत. एकरकमी एफआरपी ही आमची रास्त अपेक्षा आहे. मात्र, आमचे हक्काचे पैसे न मिळताच वसुली सुरू आहे. शेतात रात्रंदिवस घाम गाळणार्‍या शेतकर्‍यांना विचारात न घेताच दर ठरवला जातो. मात्र, हे आमच्या हक्काचे पैसे देतानाही कधी द्यायचे, कसे द्यायचे याबाबत अनभिज्ञता आहे. यातच वीज वितरणचे अधिकारी, कर्मचारी वीज पुरवठा तोडत आहेत. त्यामुळे संघटीत झालेला शेतकरी आता हे खपवून घेणार नाही. आधी आमच्या हक्काचे पैसे अदा करा, मग वसुलीसाठी दारात या. दडपशाही कराल तर याद राखा, असा इशारा देऊन पत्रकात म्हटले आहे की, वीज मंडळाच्या कर्मचार्‍यांना नम्र विनंती आहे की आपणही शेतकर्‍यांची मुले आहात. त्यामुळे शेतकरी बंधूंचा विचार करा. आगाऊपणा करून शेती पंपाच्या जोडणीला हात लावाल तर गाठ आमच्याशी आहे. ज्या संस्था व शेतकर्‍यांच्या वीज जोडण्या तोडल्या आहेत. त्यांनी संघटनेशी संपर्क साधावा, असे आवाहनही शेवटी पाटील यांनी केले आहे.
दरम्यान, याबाबत प्रशांत पाटील यांनी वीज वितरणचे अधिकारी कांबळे यांच्याशी चर्चा झाली असून त्यांनी नाडे व मरळी येथील 2 सिंचन योजनांची कनेक्शन तोडली असल्याचे सांगितले. मात्र, अन्य सर्वसामान्य शेतकर्‍यांना मुदतवाढ देणार असल्याचे आश्‍वासन दिल्याची माहिती दिली.

COMMENTS