Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

एसटीच्या कर्मचार्‍यांच्या संपाला गालबोट; सुर्ली घाटात आटपाडी-कराड बसवर दगडफेक

कराड / प्रतिनिधी : कर्मचार्‍यांचा संप सुरू असताना राज्यात अनेक ठिकाणी लालपरी सुरू झाली आहे. आटपाडी ते कराड बसवर सुर्ली घाटात (ता. कराड) अज्ञाताने

आता गुन्हेगाराच्या संपत्तीतून मिळणार पीडित व्यक्तीला मोबदला; नव्या विधेयकात खास तरतूद
सातार्‍यात विवाहितेचा जाचहाट करून खून
पठाणकोट येथे झालेल्या हल्ल्यात महाराष्ट्रातील जवान शहीद | LOKNews24

कराड / प्रतिनिधी : कर्मचार्‍यांचा संप सुरू असताना राज्यात अनेक ठिकाणी लालपरी सुरू झाली आहे. आटपाडी ते कराड बसवर सुर्ली घाटात (ता. कराड) अज्ञाताने दगडफेक केल्याची घटना घडली आहे. या दगडफेकीने कर्मचार्‍यांच्या संपाला पहिल्यांदा गालबोट लागले आहे. याप्रकरणी बस कराड तालुका पोलिस ठाण्यात तक्रार देण्यासाठी आणली होती. अद्याप गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.
घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, सांगली जिल्ह्यातील आटपाडी आगारातून निघालेली बसवर (एमएच 14 बीटी 3695) कडेगाव येथून पुढे आल्यानंतर सुर्ली घाटात दगडफेक झाली आहे. बस कराडकडे येत असताना पाठीमागून दगडफेक केली असल्याची माहिती वाहक अमोल वाघमारे यांनी माहिती दिली. दगडफेकीत कोणत्याही प्रवाशास दुखापत झाली नाही.
सातारा जिल्ह्यातील बससेवा सुरू झाली असून सांगली जिल्ह्यातील आटपाडी आगारत बससेवा सुरू झालेली आहे. मात्र, कराडकडे येत असताना बसवर दगडफेक केल्याची दुर्देवी घटना घडली आहे. त्यामुळे कर्मचार्‍यांचा संपाला गालबोट लागले आहे. कराड तालुका पोलीस ठाण्यात अज्ञातावर गुन्हा नोंद करण्याचे काम सुरू आहे.

COMMENTS