Homeताज्या बातम्याविदेश

डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर आरोपपत्र दाखल

अशी नामुष्की ओढावलेले अमेरिकेचे पहिलेच माजी राष्ट्राध्यक्ष

न्यूयार्क/वृत्तसंस्था ः पॉर्न स्टार स्टॉर्मी डॅनियल्सच्या भरपाईच्या प्रकरणात अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या अडचणी वाढल्या आ

पक्ष फोडला आता कंत्राटी भरतीचे पाप करू नका
लालपरी जागी खासगी गाड्या फलाटावर; सांगली जिल्ह्यातील प्रकाराने महामंडळाचे वाभाडे
तालीबानी मैत्री कितपत परवडेल?

न्यूयार्क/वृत्तसंस्था ः पॉर्न स्टार स्टॉर्मी डॅनियल्सच्या भरपाईच्या प्रकरणात अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या अडचणी वाढल्या आहेत. डोनाल्ड ट्रम्प यांच्या विरोधात आरोपपत्र दाखल झाले आहे. अशा प्रकारची नामुष्की ओढवलेले डोनाल्ड ट्रम्प हे अमेरिकेचे पहिलेच माजी राष्ट्राध्यक्ष ठरले आहेत. डोनाल्ड ट्रम्प यांच्या विरोधात आरोपपत्र दाखल करण्यात आले असले तरीही नेमके आरोप काय आहेत? ते सार्वजनिक करण्यात आलेले नाही.
पॉर्न स्टार नुकसान भरपाई प्रकरणात आरोपपत्र दाखल झाले असल्याने आता डोनाल्ड ट्रम्प यांच्याविरोधात खटला दाखल केला जाणार आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी 2016 च्या राष्ट्राध्यक्ष निवडणुकीच्या वेळी पॉर्न स्टारला तोंड बंद ठेवण्यासाठी दिलेल्या पैशांचे हे प्रकरण आहे. यामुळे आता डोनाल्ड ट्रम्प यांच्या अडचणींमध्ये भर पडली आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी मात्र हे आरोप फेटाळले आहेत. दुसरीकडे पॉर्न स्टार स्टॉर्मी डॅनियल्सच्या वकिलांनी हे सांगितले आहे की, माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याविरोधात आरोपपत्र दाखल होणे आणि त्यानंतर त्यांच्याविरोधात खटला चालणार ही बाब समोर येणे म्हणजेच कायद्यापेक्षा मोठे कुणीही नाही हेच दाखवून देणारे उदाहरण ठरले आहे. मॅनहॅटन जिल्ह्याचे वकील अलविन ब्रॅग यांनी न्यू यॉर्क ग्रँड ज्युरी न्यायालयात पुरावा सादर करताना निदर्शनास आणून दिले की, ट्रम्प यांच्यासोबतच्या प्रेमप्रकरणाची कुठेही वाच्यता करू नये, यासाठी स्टॉर्मी डॅनियलला 1 लाख 30 हजार डॉलर एवढी रक्कम देण्यात आली. स्टॉर्मीचे खरे नाव स्टेफनी क्लिफॉर्ड आहे. ट्रम्प राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीचा प्रचार करत असताना ही रक्कम देण्यात आली, असा आरोप करण्यात आला आहे. ट्रम्प यांचे वकील मायकल कोहेन यांनी हे पैसे क्लिफॉर्डला दिले आणि त्यानंतर ट्रम्प यांनी मायकल कोहेन यांना या पैशांची भरपाई करून दिली. समोर आलेल्या माहितीनुसार, कोहेन यांना दिलेल्या रकमेची नोंद ही कायदेशीर शुल्काच्या स्वरूपात करण्यात आली आहे. स्टॉर्मी डॅनियल 2006 पासून तिच्या या प्रेमप्रकरणाची गोष्ट विकण्याचा प्रयत्न करत आहे. त्यानंतर तिने दावा केला की, डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांच्या ‘द अँप्रेटिस’ या रिलिटी शोमध्ये काम देण्याचा बहाणा करून तिच्याशी जवळीक साधली आणि तिच्यासोबत शरीरसंबंध प्रस्थापित केले. ट्रम्प यांनी मात्र हे आरोप फेटाळून लावले आहे. दरम्यान 2006 साली या दोघांचाही एकमेकांसोबतचा एक फोटो प्रसिद्ध झालेला आहे.

COMMENTS