Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

अल्पवयीन गर्भवती मुलीच्या प्रसूतीदरम्यान अर्भकाचा मृत्यू; सातारा जिल्हा शल्यचिकित्सक निलंबित

सातारा : क्रांतिसिंह नाना पाटील जिल्हा सर्वसाधारण रुग्णालयातील एका अल्पवयीन गर्भवती मुलीच्या प्रसूतीदरम्यान झालेल्या अर्भक मृत्यू प्रकरणाने आता ग

अ‍ॅड. संदीप वर्पे यांची रयतच्या मॅनेजिंग कौन्सिलवर वर्णी
प्रथमेश कोळेकर यांना एमबीबीएस पदवी प्रदान
पोलिस अधीक्षक तुषार दोशी सक्तीच्या रजेवर

सातारा : क्रांतिसिंह नाना पाटील जिल्हा सर्वसाधारण रुग्णालयातील एका अल्पवयीन गर्भवती मुलीच्या प्रसूतीदरम्यान झालेल्या अर्भक मृत्यू प्रकरणाने आता गंभीर वळण घेतले आहे. कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका ठेवत जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. युवराज करपे आणि स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. सी. एम. शिकलगार यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. या दोन्ही अधिकार्‍यांची आता कोल्हापूर येथील आरोग्य विभागाच्या विभागीय कार्यालयात विभागीय चौकशी होईल.

COMMENTS