Homeताज्या बातम्यादेश

लोकसभा निवडणुकांचे बिगुल उद्या वाजणार

दुपारी तीन वाजता केंद्रीय निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद

नवी दिल्ली प्रतिनिधी - बहुप्रतीक्षित लोकसभा निवडणुकांचे बिगुल उद्या (शनिवारी) वाजणार आहे. उद्या दुपारी तीन वाजता केंद्रीय निवडणूक आयोगाची पत

लग्नाचे आमिष दाखवून अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी | LOKNews24
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचा जीवनसंघर्ष भारतीयांसाठी प्रेरणादायी : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
श्रीरामपुर ते नेवासा रस्त्याचे काम सुरु न केल्यास पुढील आठवड्यात माजी आ. मुरकुटे यांच्या नेतृत्वाखाली रास्तारोको

नवी दिल्ली प्रतिनिधी – बहुप्रतीक्षित लोकसभा निवडणुकांचे बिगुल उद्या (शनिवारी) वाजणार आहे. उद्या दुपारी तीन वाजता केंद्रीय निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद होणार आहे. या पत्रकार परिषदेत २०२४ च्या सार्वत्रिक (लोकसभा) निवडणुका आणि काही राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचे वेळापत्रक जाहीर होणार आहे. देशातील ५४३ लोकसभा मतदारसंघातील निवडणुकांच्या कार्यक्रमाची घोषणा उद्या होणार आहे. निवडणुकांच्या घोषणांपाठोपाठ देशभरात आचारसंहिता लागू होईल. निवडणुकीच्या घोषणेकडे राजकीय वर्तुळासह सर्वसामान्य मतदारांचे डोळे लागून राहिले आहेत. उद्या म्हणजेच शनिवार १६ मार्च रोजी दुपारी तीन वाजता लोकसभा निवडणुका आणि काही राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचे वेळापत्रक जाहीर करण्यासाठी निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली आहे. अपवादानेच शनिवार-रविवारी केंद्रीय निवडणूक आयोग पत्रकार परिषद आयोजित करतं. मात्र यावेळी आधीच घोषणांना दिरंगाई झाल्यामुळे आयोगाने शनिवारचा दिवस निवडल्याचे दिसते. निवडणूक आयोगाच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पत्रकार परिषदेचे थेट प्रक्षेपण केले जाईल.

COMMENTS