Homeताज्या बातम्या

महिनाभरापूर्वी बांधलेल्या पुलाला भगदाडनगर-मनमाड महामार्गाच्या कामाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह

देवळाली प्रवरा : नगर-मनमाड महामार्गावरील राहुरी फॅक्टरी ते राहुरी दरम्यान असलेल्या राहुरी एमआयडीसी परिसरातील नव्याने बांधण्यात आलेल्या पुलाला अवघ

विंचरणा नदीच्या जुन्या पुलावर खड्ड्यांचे साम्राज्यजामखेडकर जेरीस; लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष; नागरिकांत संताप
जिल्हा परिषदेच्या मुख्यालयात अस्वच्छतेचे साम्राज्यकर्मचारी व नागरिक त्रस्त, प्रशासनाची उदासीनता कायमइमारतीच्या पायर्‍यांचे ग्रील व स्लॅब खराब झाले
भोकर बसस्थानकाला तळ्याचे स्वरूप; खड्डे, चिखल अन् पाण्यामुळे प्रवाशांचे हालप्रशासनाच्या दुर्लक्षाचा फटका हजारो प्रवाशांना; तातडीने उपाययोजनांची मागणी


देवळाली प्रवरा : नगर-मनमाड महामार्गावरील राहुरी फॅक्टरी ते राहुरी दरम्यान असलेल्या राहुरी एमआयडीसी परिसरातील नव्याने बांधण्यात आलेल्या पुलाला अवघ्या महिनाभरातच मोठे भगदाड पडल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकारामुळे महामार्गावरील प्रवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला असून, संबंधित ठेकेदाराच्या कामाच्या दर्जाबाबत नागरिकांनी गंभीर शंका उपस्थित केल्या आहेत.
नगर-मनमाड महामार्गावर दिवस-रात्र मोठ्या प्रमाणावर अवजड वाहनांची वाहतूक सुरू असते. अशा परिस्थितीत नव्याने बांधलेल्या पुलाची झालेली दुरवस्था पाहता वाहनचालक व नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, अवजड वाहतुकीचा भार सहन करण्यासाठी मजबूत दर्जाचे बांधकाम अपेक्षित असताना पुलाच्या बांधकामात निकृष्ट साहित्याचा वापर करण्यात आला. पुलाच्या कामात केवळ 6 एमएम गजाचा वापर केल्याचा आरोप नागरिकांनी केला असून, या प्रकरणाची तातडीने तांत्रिक चौकशी करण्याची मागणी होत आहे.
दरम्यान, राहुरी तालुक्यात तीन आमदार आणि दोन खासदार असतानाही नगर-मनमाड महामार्गाच्या कामावर पुरेसे लक्ष दिले जात नसल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली आहे. महामार्गावरील वाढत्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर लोकप्रतिनिधींनी अधिक सक्रिय भूमिका घेण्याची गरज असल्याचे मत नागरिकांनी व्यक्त केले.
पुलाला पडलेल्या भगदाडामुळे मोठा अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली असून, विशेषतः रात्रीच्या वेळी वाहनचालकांसाठी धोका अधिक वाढला आहे. त्यामुळे संबंधित विभागाने तातडीने पाहणी करून पुलाची दुरुस्ती करावी तसेच दोषी आढळणाऱ्या ठेकेदारावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.
अवघ्या महिनाभरापूर्वी बांधण्यात आलेल्या पुलाला भगदाड पडल्याने नगर-मनमाड महामार्गावरील कामांच्या गुणवत्तेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, प्रशासनाच्या पुढील कारवाईकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.
 राहुरी एमआयडीसी परिसरातील नव्याने बांधलेल्या पुलाला भगदाड पडल्याची घटना समोर आल्यानंतर अखेर संबंधित ठेकेदाराला जाग आली आहे. पुलावरील भगदाडाची माहिती समोर येताच दुरुस्तीचे काम तातडीने सुरू करण्यात आले आहे.
अपघाताची शक्यता; ठेकेदारावर कारवाईची मागणी
पुलाला पडलेल्या भगदाडामुळे मोठा अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली असून, विशेषतः रात्रीच्या वेळी वाहनचालकांसाठी धोका अधिक वाढला आहे. त्यामुळे संबंधित विभागाने तातडीने पाहणी करून पुलाची दुरुस्ती करावी तसेच दोषी आढळणाऱ्या ठेकेदारावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.

COMMENTS