संगमनेर : सध्याच्या धावपळीच्या जीवनामध्ये प्रत्येकाला स्वतःचे आरोग्य सांभाळणे अत्यंत गरजेचे असून योगामुळे शरीर लवचिक होते त्यामुळे प्रत्येकाने न

संगमनेर : सध्याच्या धावपळीच्या जीवनामध्ये प्रत्येकाला स्वतःचे आरोग्य सांभाळणे अत्यंत गरजेचे असून योगामुळे शरीर लवचिक होते त्यामुळे प्रत्येकाने नियमित योगासने करा असे आवाहन जयहिंद लोकचळवळीचे संस्थापक माजी आ.डॉ.सुधीर तांबे यांनी केले असून योगा हा भारताची जगाला देण असल्याचे कॅन्सर तज्ञ डॉ.जयश्री थोरात यांनी म्हटले आहे. योग दिनामध्ये 1500 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.
सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात क्रीडा संकुल येथे सह्याद्री विद्यालय व ज्युनिअर कॉलेज एकविरा फाउंडेशन आणि जयहिंद लोक चळवळ यांच्या संयुक्त विद्यमाने आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा झाला. यावेळी माजी आ.डॉ.सुधीर तांबे, दुर्गा तांबे,डॉ.प्रमोद राजुस्कर,डॉ.कर्पे, प्रमिला अभंग, डॉ.अनुराधा सातपुते आदींसह सर्व शिक्षक व युवक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्ताने सह्याद्री विद्यालय व ज्युनिअर कॉलेजच्या 1500 विद्यार्थी व एकवीरा आणि जयहिंद लोकचळवळ मधील युवकांनी एकत्रित योगाचे विविध प्रकार करत योग दिन साजरा केला.
याप्रसंगी बोलताना माजी आ.डॉ.तांबे म्हणाले की, माजी शिक्षणमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली सह्याद्री संस्थेच्या वतीने विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासाकरता सातत्याने विविध उपक्रमांचे आयोजन केले आहे. धावपळीच्या जीवनामध्ये आरोग्य अत्यंत महत्त्वाचे आहे. दररोज वीस मिनिटे तरी योग करा. योगासनामुळे शरीर लवचिक होत असून शरीरासाठी अत्यंत चांगला असलेला सूर्यनमस्कार हा प्रकार प्रत्येकाने जास्तीत जास्त करावा असे आवाहन त्यांनी केले.
योगामुळे शरीराला ऊर्जा मिळते. मन शांत व आनंदी होते. आरोग्य चांगले राहते. नियमित योगाभ्यासामुळे स्नायूंची ताकद वाढते आणि मानसिक तणाव दूर होतो. त्यामुळे प्रत्येकाने आपल्या रोजच्या दिनचर्येमध्ये योगाचा समावेश करावा. व आपले जीवन निरोगी बनवावे यासाठी अशा शुभेच्छा माजी शिक्षण मंत्री बाळासाहेब थोरात यांनी आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्ताने दिल्या.
यावेळी शहरातील व ग्रामीण भागातील युवक कार्यकर्ते, महिला, तसेच सह्याद्री शिक्षण संस्थेचे सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. याप्रसंगी एकवीरा फाउंडेशनच्या वतीने पौष्टिक डिंक लाडूचे वाटप विद्यार्थ्यांना करण्यात आले.

COMMENTS