Homeताज्या बातम्या

नालीकामाच्या संथ गतीमुळे मालेगाव रोडवर सांडपाण्याचे साम्राज्य; नागरिक हैराणशारदा कन्स्ट्रक्शनचे काम रखडले; विद्यार्थी, वाहनचालक व नागरिकांची गैरसोय

नांदेड शहरातील मालेगाव रोड महालक्ष्मी ऑइल शोरूम ते कॅनल रोड चौक या महत्त्वाच्या मार्गावर शारदा कन्स्ट्रक्शन कंपनीमार्फत नालीचे बांधकाम सुरू आहे.

विंचरणा नदीच्या जुन्या पुलावर खड्ड्यांचे साम्राज्यजामखेडकर जेरीस; लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष; नागरिकांत संताप
बीड शहरात भटक्या कुत्र्यांचा वाढता उपद्रव; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरणनगरपालिकेने तातडीने उपाययोजना करण्याची नागरिकांची मागणी
भोकर बसस्थानकाला तळ्याचे स्वरूप; खड्डे, चिखल अन् पाण्यामुळे प्रवाशांचे हालप्रशासनाच्या दुर्लक्षाचा फटका हजारो प्रवाशांना; तातडीने उपाययोजनांची मागणी



नांदेड शहरातील मालेगाव रोड महालक्ष्मी ऑइल शोरूम ते कॅनल रोड चौक या महत्त्वाच्या मार्गावर शारदा कन्स्ट्रक्शन कंपनीमार्फत नालीचे बांधकाम सुरू आहे. मात्र काम अत्यंत संथ गतीने सुरू असल्याने परिसरातील नागरिकांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. नालीचे बांधकाम अद्याप पूर्ण न झाल्यामुळे सांडपाण्याचा निचरा होत नसून रस्त्यावर साचलेल्या घाण पाण्यामुळे नागरिकांचे दैनंदिन जीवन विस्कळीत झाले आहे.
कामासाठी अनेक ठिकाणी खोदकाम करण्यात आले असून काही भागात नालीचे बांधकाम पूर्ण झाले आहे. मात्र महालक्ष्मी ऑइल शोरूम ते कॅनल रोड चौक या पट्ट्यात काम अद्याप अपूर्ण असल्याने घरगुती सांडपाणी थेट रस्त्यावर वाहत आहे. त्यामुळे परिसरात दुर्गंधी, चिखल आणि डासांचा प्रादुर्भाव वाढला असून आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. या मार्गावरून दररोज शाळा-महाविद्यालयातील विद्यार्थी, महिला, ज्येष्ठ नागरिक तसेच शेकडो वाहनचालकांची ये-जा असते. साचलेल्या सांडपाण्यातून मार्ग काढताना नागरिकांना मोठी कसरत करावी लागत असून पावसाळ्यात परिस्थिती आणखी गंभीर होत आहे. दुचाकीस्वार घसरून अपघात होण्याचाही धोका वाढला आहे. स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे की, विकासकामे सुरू असणे आवश्यक असले तरी ती वेळेत पूर्ण होणे अधिक महत्त्वाचे आहे. रखडलेल्या कामामुळे नागरिकांना अनेक महिन्यांपासून त्रास सहन करावा लागत असल्याने मोरगे कन्स्ट्रक्शनने कामाचा वेग वाढवून नालीचे बांधकाम लवकरात लवकर पूर्ण करावे, अशी मागणी होत आहे.
नागरिकांच्या प्रमुख मागण्या मालेगाव रोड
महालक्ष्मी ऑइल शोरूम ते कॅनल रोड चौकपर्यंतचे नालीचे काम तातडीने पूर्ण करावे., साचलेल्या सांडपाण्याचा त्वरित निचरा करून परिसर स्वच्छ करावा., कामाचा वेग वाढवून नागरिकांची गैरसोय दूर करावी., पावसाळ्यात सुरक्षिततेसाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात., काम पूर्ण होईपर्यंत नियमित स्वच्छता व डास प्रतिबंधक फवारणी करावी.

COMMENTS