Homeताज्या बातम्याअहमदनगर

चारणवाडीत छापा टाकून ११ लाखांचा गांजा जप्तपारनेर पोलिसांची मोठी कारवाई ; आरोपी फरार

पारनेर : अंमली पदार्थांच्या तस्करांविरुद्ध पारनेर पोलिसांनी मोठी कारवाई केली. तालुक्यातील चारणवाडी येथे टाकलेल्या छाप्यात पोलिसांनी तब्बल ४२.५०० किलो ग्रॅम गांजा आणि एक मारुती अल्टो कार असा एकूण ११ लाख १२ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या कारवाईमुळे परिसरात अंमली पदार्थ तस्करांचे धाबे दणाणले आहेत.पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार, पारनेर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संतोष खेडकर यांना गोपनीय बातमीदाराकडून एक महत्त्वपूर्ण माहिती मिळाली. चारणवाडी (काताळवेढा) येथील रहिवासी आरोपी राहुल बाळासाहेब गुंड याने आपल्या घराच्या पाठीमागे पार्क केलेल्या अल्टो ८०० कारमध्ये मोठ्या प्रमाणात गांजा लपवून ठेवल्याची ती माहिती होती.माहिती मिळताच पोलिसांनी वेळ न घालवता स्थानिक गुन्हे शाखा, अहिल्यानगर आणि पारनेर पोलिसांचे संयुक्त पथक तयार केले. या पथकाने चारणवाडी येथे तात्काळ छापा टाकला. छाप्यात कारची झडती घेतली असता, त्यात ११ लाख रुपयांपेक्षा जास्त किमतीचा बेकायदेशीर गांजा मिळून आला. मात्र, पोलिसांची चाहूल लागताच आरोपी राहुल गुंड घटनास्थळावरून फरार होण्यात यशस्वी झाला.याप्रकरणी पारनेर पोलीस स्टेशनमध्ये आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या फरार आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलिसांची पथके रवाना झाली आहेत.सदरची यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक मुम्मक्का सुदर्शन, अप्पर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे, उपविभागीय पोलीस अधिकारी  शिरीष वमने आणि पोनि. संतोष खेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेकॉ. संदीप गायकवाड, कल्याण लगड, अमोल धामणे, पो.कॉ. गणेश डोंगरे, सारंग वाघ, अभिजित बोरुडे, तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे पीएसआय महादेव गुट्टे, संतोष खैरे, अमृत आढाव, बाळासाहेब गुंजाळ, राहुल गुंडू व नितीन शिंदे यांच्या पथकाने केली. या धडक कारवाईचे तालुक्यात कौतुक होत असून, पुढील तपास पोलीस निरीक्षक संतोष खेडकर करत आहेत.

सोनई पोलिसांची अवैध धंद्यांविरोधात कारवाई  
महाराष्ट्रात भोंदू साधू, गुन्हेगार व अत्याचार्‍यांचे सरकार- डॉ. रॅपनवाड
’मकोका’मधील फरार आरोपीला पोलिसांनी सिनेस्टाईलने केली अटक

COMMENTS