Homeताज्या बातम्याअहमदनगर

पाणंद रस्ते ग्रामीण मार्गात समाविष्ट करण्यासाठी श्रीगोंदेत धरणे

श्रीगोंदा : तालुक्यातील पारगाव सुद्रिक येथील शेतकरी व ग्रामस्थांनी शेत/पाणंद रस्ते ग्रामीण मार्गात दर्जोन्नत करण्याच्या मागणीसाठी पंचायत समिती कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्याचा प्रशासनाला निवेदनाद्वारे इशारा करण्यात आला होता. याबाबतचे निवेदन उपविभागीय अधिकारी (स्थापत्य) जिल्हा परिषद बांधकाम उपविभाग श्रीगोंदा यांना देण्यात आले आहे.शिवसेना पदाधिकारी तथा ग्रामस्थ रघुनाथ जानदेव सप्ताळ व विलास मोहन गोरेखे यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, पारगाव सुद्रिक येथील अनेक शेत/पाणंद रस्ते हे योजना बाह्य अथवा अवर्गीकृत रस्ते म्हणून आहेत. हे रस्ते ग्रामीण मार्गात दर्जोन्नत करून संबंधित प्लॅनमध्ये समाविष्ट करण्याची मागणी यापूर्वी अनेक वेळा करण्यात आली होती. यासंदर्भात ग्रामपंचायत, पंचायत समिती तसेच संबंधित विभागांकडे वेळोवेळी पत्रव्यवहार देखील करण्यात आला आहे.मात्र, वारंवार पाठपुरावा करूनही प्रशासनाकडून कोणतीही ठोस कार्यवाही झाली नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. त्यामुळे या मागणीच्या अंमलबजावणीसाठी पंचायत समिती, श्रीगोंदा कार्यालयाच्या आवारात मंगळवार दि. १९ मे २०२६ रोजी सकाळी ११ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत धरणे आंदोलन करण्यात आले.सदर आंदोलन मागण्या पूर्ण होईपर्यंत दररोज सुरू ठेवण्यात येणार असल्याचा इशाराही आंदोलनकर्त्यांनी प्रशासनाला दिला आहे. या निवेदनाच्या प्रती खासदार नीलेश लंके, तहसीलदार श्रीगोंदा, गटविकास अधिकारी पंचायत समिती श्रीगोंदा, पोलीस निरीक्षक श्रीगोंदा तसेच ग्रामविकास अधिकारी ग्रामपंचायत पारगाव सुद्रिक यांना देण्यात आल्या आहेत. ग्रामस्थांच्या या आंदोलनामुळे तालुक्यातील रस्त्यांच्या प्रश्नाकडे प्रशासनाचे लक्ष वेधले जाण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

चांभुर्डी गावाने जतन केला मराठेशाहीचा जिवंत इतिहासबुरुज, देवडी आणि दगडी पायऱ्यांसह ऐतिहासिक ‘वेस’ आजही सुस्थितीत
यशवंत विद्या पतसंस्थेच्या अध्यक्षपदी प्रा. पवार तर शेळके उपाध्यक्ष
भटके विमुक्त समाज जनगणनेतून वंचित राहू नयेसहारा सर्वांगीण विकास संस्थेचे निवेदन ; प्रशासनाला विशेष सूचनांची मागणी
filter: 0; fileterIntensity: 0.0; filterMask: 0; captureOrientation: 0;
brp_mask:0;
brp_del_th:null;
brp_del_sen:null;
delta:null;
module: photo;hw-remosaic: false;touch: (-1.0, -1.0);sceneMode: 8;cct_value: 0;AI_Scene: (-1, -1);aec_lux: 0.0;aec_lux_index: 0;albedo: ;confidence: ;motionLevel: -1;weatherinfo: null;temperature: 47;

COMMENTS